12GB RAM, वेगवान डिस्प्ले आणि आकर्षक डिजाईनसह येतोय OnePlus 10 Pro; रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा
By सिद्धेश जाधव | Published: November 10, 2021 04:06 PM2021-11-10T16:06:20+5:302021-11-10T16:07:11+5:30
OnePlus 10 Pro Design: रेंडर्सनुसार OnePlus 10 Pro स्मार्टफोनची डिजाईन Samsung Galaxy S21 सीरीज सारखी असू शकते.
वनप्लसचे चाहते आता आगामी OnePlus 10 सीरिजची वाट बघत आहेत. ही कंपनीची आगामी फ्लॅगशिप सीरिज आहे, जी जुन्या OnePlus 9 सीरिजची जागा घेईल. या सीरिजमधील एक फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10 Pro नावाने सादर केला जाऊ शकतो. आता या आगामी वनप्लस फोनचे रेंडर लीक झाले आहेत. OnLeaks आणि Zouton यांनी मिळून आगामी OnePlus 10 Pro चे रेंडर लीक केले आहेत, त्यामळे स्मार्टफोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे.
OnePlus 10 Pro ची डिजाइन
रेंडर्सनुसार OnePlus 10 Pro स्मार्टफोनची डिजाईन Samsung Galaxy S21 सीरीज सारखी वाटत आहे. या फोनच्या बॅक पॅनलवरील कॅमेरा मॉड्यूल Galaxy S21 सारखा दिसत आहे. ज्यात LED फ्लॅशसह तीन कॅमेरा सेन्सर मिळतील. हा फोनमध्ये ग्रेनी टेक्सचर असलेला बॅक पॅनल मिळेल, त्यामुळे फोनची पकड मजबूत असेल.आगामी वनप्लस स्मार्टफोनमध्ये पॉवर बटन देखील टेक्सचरसाग सादर केला जिळ. त्याचबरोबर वॉल्यूम बटन देण्यात येईल. यावेळी कंपनी फोनयामध्ये स्लाईडर अलर्ट देणार नाही.
OnePlus 10 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
OnePlus 10 Pro मध्ये 6.7-इंचाचा 1440p रिजोल्यूशन असलेलं डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल, त्यामुळे फोनचा डिस्प्ले स्मूद ऑपरेट होईल. प्रोसेसिंगसाठी आगामी वनप्लसमध्ये Qualcomm Snapdragon 898 चिपसेट मिळेल. तसेच फोनमधील 5000mAh ची बॅटरी आणि कंपनीच्या Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. त्याचबरोबर 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. OnePlus 10 Pro मध्ये Android 12 आधारित ColorOS किंवा OxygenOS मिळू शकतो.