ही बातमी वाचल्यावर नाचू लागतील OnePlus फॅन्स; कंपनी लवकरच सादर करणार सर्वात पावरफुल स्मार्टफोन
By सिद्धेश जाधव | Published: February 16, 2022 11:58 AM2022-02-16T11:58:04+5:302022-02-16T11:59:01+5:30
OnePlus 10 Pro India Launch: वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे.
OnePlus उद्या भारतीयांना खुश करणार आहे, कंपनी 17 फेब्रुवारीला आपला स्वस्त OnePlus Nord CE 2 5G भारतात सादर करणार आहे. परंतु यापेक्षाही मोठी बातमी म्हणजे पुढील महिन्यात वनप्लस आपला सर्वात पावरफुल स्मार्टफोन देशात लाँच करणार आहे. कंपनीच्या फ्लॅगशिप फोन OnePlus 10 Pro ची मार्चमध्ये एंट्री होणार आहे.
OnePlus 10 Pro India Launch
91मोबाईल्सच्या रिपोर्टनुसार, वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल. रिपोर्टमध्ये 15 किंवा 16 मार्चला हा फोन लाँच होईल असं सांगण्यात आलं आहे. तसेच याची विक्री अॅमेझॉनच्या ‘होळी सेल’ मध्ये केली जाईल. लवकरच या फोनची अधिकृत घोषणा देखील OnePlus कडून समोर येऊ शकते.
OnePlus 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस 10 प्रो चे सर्वच स्पेक्स दर्जेदार आहेत. याची सुरुवात 6.7 इंचाच्या 2के फ्ल्यूड अॅमोलेड एलटीपीओ 2.0 डिस्प्लेपासून होते. पंच-होल डिजाईन असलेला हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शनसह यात एचडीआर10+ आणि एमईएमसी सारखे फीचर्स मिळतात.
वनप्लस 10 प्रो लेटेस्ट अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 12GB वेगवान LPDDR5 RAM आणि 256GB लेटेस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. यात 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी या फ्लॅगशिप किलरमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा:
- आताच खरेदी करून ठेवा ‘हे’ गॅजेट्स; लवकरच बदलणार Smartphone पासून Refrigerator च्या किंमती
- रेडमीची झोप उडवण्याचा डाव रचतेय Realme; बजेट सेगमेंटमध्ये फाडू स्मार्टफोनची होणार एंट्री