सॅमसंग-शाओमी अनुभवणार मार्च-एंडिंगचा दबाव? 31 तारखेला येतोय ‘हा’ जबराट 5G स्मार्टफोन  

By सिद्धेश जाधव | Published: March 24, 2022 07:47 PM2022-03-24T19:47:49+5:302022-03-24T19:48:55+5:30

OnePlus 10 Pro च्या भारतीय लाँचची तारीख ठरली आहे. 31 मार्चला हा फोन जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह एंट्री घेऊ शकतो.  

OnePlus 10 Pro India Launch Date Confirmed Launch On 31 March   | सॅमसंग-शाओमी अनुभवणार मार्च-एंडिंगचा दबाव? 31 तारखेला येतोय ‘हा’ जबराट 5G स्मार्टफोन  

सॅमसंग-शाओमी अनुभवणार मार्च-एंडिंगचा दबाव? 31 तारखेला येतोय ‘हा’ जबराट 5G स्मार्टफोन  

googlenewsNext

OnePlus 10 Pro ची वाट भारतीय ग्राहक जानेवारी 2022 पासून बघत आहेत. आता कंपनीनं स्वतःहून सांगितलं आहे कि हा फोन या महिन्याच्या शेवटी भारतीयांच्या भेटीला येईल. एका व्हर्च्युअल इव्हेंटच्या माध्यमातून हा Snapdragon 8 Gen 1 SoC प्रोसेसर असलेला स्मार्टफोन देशात सादर केला जाईल. संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी हा इव्हेंट सुरु होईल. OnePlus 10 Pro सोबतच Bullets Wireless Z2 आणि OnePlus Buds Pro Silver Edition देखील भारतात सादर केले जाऊ शकतात.  

OnePlus 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

वनप्लस 10 प्रो चे सर्वच स्पेक्स दर्जेदार आहेत. याची सुरुवात 6.7 इंचाच्या 2के फ्ल्यूड अ‍ॅमोलेड एलटीपीओ 2.0 डिस्प्लेपासून होते. पंच-होल डिजाईन असलेला हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शनसह यात एचडीआर10+ आणि एमईएमसी सारखे फीचर्स मिळतात. 

हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. यात 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी या फ्लॅगशिप किलरमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करते.   

वनप्लस 10 प्रो लेटेस्ट अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 12GB वेगवान LPDDR5 RAM आणि 256GB लेटेस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंट देण्यात आला आहे. 

Web Title: OnePlus 10 Pro India Launch Date Confirmed Launch On 31 March  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.