अॅप्पल-सॅमसंग सावधान! OnePlus चा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय भारतात; या दिवशी होऊ शकतो लाँच
By सिद्धेश जाधव | Published: March 10, 2022 09:15 AM2022-03-10T09:15:09+5:302022-03-10T09:15:41+5:30
OnePlus 10 Pro स्मार्टफोन लवकरच Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, नवीन 80W फास्ट चार्जिंग आणि Android 12 OS सह भारतात येऊ शकतो.
OnePlus 10 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी या फोनच्या जागतिक लाँचची घोषणा केली होती. आता लवकरच हा फोन भारतासह युरोप आणि उत्तर अमेरिकेत या महिन्याच्या अखेरीस सादर केला जाऊ शकतो. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, नवीन 80W फास्ट चार्जिंग आणि Android 12 OS सह सादर झाला आहे.
OnePlus 10 Pro इंडिया लाँच डेट
टिपस्टर योगेश ब्रारनं दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 10 Pro स्मार्टफोन भारतात 22 मार्च किंवा 24 मार्चला लाँच केला जाऊ शकतो. कंपनी हा फोन पुढील आठवड्यापासून टीज करण्यास सुरुवात करू शकते. OnePlus 10 Pro च्या भारतीय किंमतीची माहिती मिळाली नाही. परंतु चीनमध्ये या फोनची किंमत 55 हजार रुपयांच्या आसपास सादर झाला आहे.
OnePlus 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस 10 प्रो चे सर्वच स्पेक्स दर्जेदार आहेत. याची सुरुवात 6.7 इंचाच्या 2के फ्ल्यूड अॅमोलेड एलटीपीओ 2.0 डिस्प्लेपासून होते. पंच-होल डिजाईन असलेला हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शनसह यात एचडीआर10+ आणि एमईएमसी सारखे फीचर्स मिळतात.
वनप्लस 10 प्रो लेटेस्ट अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 12GB वेगवान LPDDR5 RAM आणि 256GB लेटेस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. यात 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी या फ्लॅगशिप किलरमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा:
- स्वस्त आणि नवीन iPhone SE (2022) घ्यावा कि त्याच किंमतीत iPhone 12 सीरिजचा मॉडेल निवडावा?
- Amazon TV Sale: अर्ध्या किंमतीत मिळतेय 43-इंचाची Smart TV; फक्त काही दिवस 'ही' भन्नाट ऑफर
- 108MP कॅमेऱ्यासह Redmi चा दमदार 5G स्मार्टफोन; रियलमीला धक्का देईल अशी आहे किंमत