आत्ताच नवा स्मार्टफोन घेऊन पैसे वाया घालवू नका, OnePlus चा सर्वात पावरफुल मोबाईल येतोय
By सिद्धेश जाधव | Published: March 21, 2022 03:53 PM2022-03-21T15:53:05+5:302022-03-21T15:53:15+5:30
OnePlus 10 Pro च्या भारतीय लाँचची माहिती स्वतः कंपनीनं दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही वनप्लस फॅन्स असाल तर कंपनीच्या सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनसाठी थांबू शकता.
OnePlus 10 Pro काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आला आहे. तेव्हापासून भारतीय फॅन्स या सर्वात शक्तिशाली वनप्लसची आतुरतेने वाट बघत आहेत. आता वनप्लस इंडियानं स्वतःहून या फोनचा भारतीय लाँच टीज केला आहे. लिक्सनुसार, हा फोन भारतात 23 किंवा 24 मार्चला लाँच केला जाईल. तसेच या हँडसेटच्या काही स्पेक्सची माहिती देखील मिळाली आहे.
डिसेंबर 2021 मध्ये चीनमध्ये आलेला वनप्लस 10 प्रो भारतात ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. तसेच या फोनचे Volcanic Black आणि Emerald Forest कलर व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला येतील. जे 8GB RAM/128GB आणि 12GB RAM/256GB व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होतील. चीनमध्ये या फोनची किंमत 55 हजार रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे.
OnePlus 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस 10 प्रो चे सर्वच स्पेक्स दर्जेदार आहेत. याची सुरुवात 6.7 इंचाच्या 2के फ्ल्यूड अॅमोलेड एलटीपीओ 2.0 डिस्प्लेपासून होते. पंच-होल डिजाईन असलेला हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शनसह यात एचडीआर10+ आणि एमईएमसी सारखे फीचर्स मिळतात.
वनप्लस 10 प्रो लेटेस्ट अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 12GB वेगवान LPDDR5 RAM आणि 256GB लेटेस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंट देण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. यात 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी या फ्लॅगशिप किलरमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करते.