OnePlus 10 Pro: सर्वात शक्तिशाली OnePlus स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Oppo च्या ऑपरेटिंग सिस्टमसह करणार एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: December 17, 2021 03:55 PM2021-12-17T15:55:22+5:302021-12-17T15:55:34+5:30
OnePlus 10 Pro: वनप्लसचा OnePlus 10 Pro स्मार्टफोन Qualcomm च्या नव्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला जाईल. वनप्लसचा आगामी 5,000mAh बॅटरीसह बाजारात येईल, ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
OnePlus 10 Pro: OnePlus सध्या दोन स्मार्टफोन सीरिजवर काम करत आहे. यातील OnePlus Nord 2 CE हा मिडरेंजमध्ये सादर केला जाईल. तर OnePlus 10 सीरीज अंतर्गत फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केले जातील. नॉर्ड 2 सीई पुढील वर्षीच्या सुरुवातील भारतात येईल. तर त्याच कालावधीत OnePlus 10 Pro स्मार्टफोन चीनमध्ये सादर केला जाऊ शकतो. आता प्रसिद्ध टिपस्टर Digital Chat Station नं आगामी OnePlus 10 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेत.
OnePlus 10 Pro चे लीक स्पेसिफिकेशन
Digital Chat Station नं दिलेल्या माहितीनुसार, वनप्लसचा हा स्मार्टफोन Qualcomm च्या नव्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला जाईल. वनप्लसच्या या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळू शकते. यात Android 12 आधारित ओप्पोचा कलर ओएस चीनमध्ये दिला जाऊ शकतो. जागतिक बाजारात मात्र कंपनी ऑक्सिजन ओएसची साथ सोडणार नाही.
या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Curved LTPO AMOLED डिस्प्ले दिला जाईल. हा डिस्प्ले 2K रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. कॅमेरा सेगमेंटमध्ये कंपनी Hasselblad सोबत भागेदारी कायम ठेवणार आहे. फोनच्या मागे 48MP चा मुख्य सेन्सर, 50MP ची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 8MP चा ऑक्सेलरी सेन्सर देण्यात येईल. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. वनप्लसचा आगामी 5,000mAh बॅटरीसह बाजारात येईल, ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.