२२ सप्टेंबरला OnePlus मोठा धमाका करण्याच्या तयारीत, ट्वीटनं वाढवली ग्राहकांची उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:46 PM2022-09-19T12:46:06+5:302022-09-19T12:46:34+5:30
OnePlus 10R Prime Blue Edition : कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत ग्राहकांची उत्सुकता वाढवली आहे. पाहा नक्की काय आहे प्रकार?
OnePlus 10R Prime Blue Edition : वापरकर्ते OnePlus 10R प्राइम ब्लू एडिशनची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतात हा स्मार्टफोन 22 सप्टेंबर रोजी लाँच केला जाणार असल्याच्या वृत्ताला कंपनीनं ट्वीट करत दुजोरा दिला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून फोनच्या लाँच तारखेची पुष्टी केली. अमेझॉन इंडियाच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये यूजर्स हा फोन खरेदी करू शकतील. याशिवाय, फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि वनप्लस स्टोअर्सवरून देखील खरेदी केला जाऊ शकतो. फीचर्सच्या बाबतीत हा फोन मूळ OnePlus 10R सारखाच असेल.
OnePlus चा हा प्रीमियम 5G फोन 1080x2412 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच फुल एचडी + 10-बिट AMOLED डिस्प्लेसह येईल. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 340Hz इतका आहे. पिक्चर क्वालिटीच्या सर्वोत्तम अनुभवासाठी, कंपनी फोनमध्ये HDR10+ देखील देत आहे. शिवाय डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील आहे.
कायआहेखास?
फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज ऑप्शन्समध्ये येतो. यामध्ये तुम्हाला MediaTek Dimension 8100 Max चिपसेट पाहायला मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेल मुख्य लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.
Something #OutOfTheBlue is coming your way to give you the smartphone experience you were always looking for!
— OnePlus India (@OnePlus_IN) September 18, 2022
Keep an eye on @amazonIN to know more!
कशीअसेलबॅटरी
सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh आणि 4500mAh बॅटरीचे पर्याय देण्यात आले आहेत. 5000mAh बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याच वेळी, कंपनी 4500mAh वेरिएंटमध्ये 150W चे चार्जिंग देत आहे. फोनचा हा प्राइम ब्लू एडिशन कोणत्या बॅटरी आणि चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल याबद्दल निश्चितपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.