कट्टर चाहत्यांची नाराजी ओढवून घेऊ शकते OnePlus; आगामी फोनमध्ये मिळणार नाही लोकप्रिय फिचर
By सिद्धेश जाधव | Published: March 30, 2022 07:58 PM2022-03-30T19:58:26+5:302022-03-30T19:59:09+5:30
OnePlus 10R चे रेंडर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. हा फोन 150W फास्ट चार्जिंग स्पीडसह बाजारात येईल.
गेले कित्येक दिवस OnePlus 10R च्या बातम्या येत आहेत. आता या स्मार्टफोनचे रेंडर्स लीक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी फोनचे स्पेसिफिकेशन समोर आले होते. लीक रेंडर्स मोठ्याप्रमाणावर Realme GT Neo 3 सारखे दिसत आहेत. टिप्सटर Yogesh Brar नं दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही फोन्सच्या एलईडी फ्लॅश लाईटची जागा सोडली तर बाकी सर्व डिजाईन सारखीच आहे.
फोनच्या मागे Oneplus चं ब्रँडिंग दिसत आहे. रेंडर्समधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, रियलमी जीटी नियो 3 सारखा दिसतो. OnePlus 10R फोन ब्लॅक कलर आणि मॅट फिनिशसह दिसत आहे. इतर रंग देखील बाजारात येऊ शकतात. या रेंडर्समध्ये वनप्लसचा सिग्नेचर स्लायडर बटन गायब दिसत आहे, त्यामुळे कट्टर वनप्लस चाहते नाराज होऊ शकतात.
OnePlus 10R चे लीक स्पेसिफिकेशन्स
OnePlus 10R स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ ई4 अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात येईल. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि HDR 10+ ला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेटचा वापर करेल. सोबत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा डिवाइस Android 12 वर आधारित OxygenOS 12 वर काम करेल.
OnePlus 10R च्या मागे असेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर मिळू शकतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची Sony IMX355 अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो लेन्स देण्यात येईल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगर सेन्सरची सुरक्षा मिळते.
हा पहिला वनप्लस डिवाइस असू शकतो ज्यात अलर्ट स्लायडर दिला जाणार नाही. फोनमध्ये Dolby Audio स्पीकर, NFC आणि High-Res Audio असे फीचर्स मिळतील. या फोनमध्ये 4500mAh बॅटरी असू शकते, जी 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा चार्जिंग स्पीड Realme GT Neo 3 मध्ये देखील मिळाला होता. रिपोर्टनुसार, रियलमीच्या फोन प्रमाणेच वनप्लस देखील या फोनचा 5000mAh बॅटरी आणि 80W चार्जिंग स्पीड असलेला अजून एक व्हर्जन सादर करू शकते.