जगात सर्वात आधी भारतात येणार OnePlus 10R स्मार्टफोन? चुकून पोस्ट झाली जाहिरात  

By सिद्धेश जाधव | Published: April 13, 2022 08:07 PM2022-04-13T20:07:37+5:302022-04-13T20:08:18+5:30

आगामी OnePlus 10R स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या एका जाहिरातीमधून समोर आला आहे.  

OnePlus 10R Smartphone Design Shown In Amazon Ad Ahead Of launch   | जगात सर्वात आधी भारतात येणार OnePlus 10R स्मार्टफोन? चुकून पोस्ट झाली जाहिरात  

जगात सर्वात आधी भारतात येणार OnePlus 10R स्मार्टफोन? चुकून पोस्ट झाली जाहिरात  

googlenewsNext

OnePlus यंदा सप्टेंबर पर्यंत 6 स्मार्टफोन्स भारतात सादर करणार आहे. यातील OnePlus 10 Pro तर लाँच झाला आहे आणि 28 एप्रिलला Nord CE 2 Lite 5G देखील भारतात येणार आहे. परंतु त्याआधीच OnePlus 10R स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon च्या एका इंटाग्राम जाहिरातीमध्ये OnePlus 10R स्मार्टफोन दिसला आहे.  

91mobiles च्या रिपोर्टनुसार, OnePlus 10R ची जाहिरात एक ट्वीटर युजरनं स्पॉट केली आहे. या जाहिरातीमधून डिवाइसच्या मागच्या बाजूची डिजाइन दिसली आहे. रियर पॅनलचा कॅमेरा मॉड्यूल याआधी आलेल्या रेंडरशी मिळता जुळत आहे. फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूलमध्ये LED फ्लॅशसह तीन कॅमेरा सेन्सर दिसत आहेत. या लीकमुळे OnePlus 10R सर्वप्रथम भारतात सादर केला जाईल का? असा प्रश्न टेक विश्वात उभा राहिला आहे.  

OnePlus 10R चे लीक स्पेसिफिकेशन्स  

OnePlus 10R स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ ई4 अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात येईल. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि HDR 10+ ला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेटचा वापर करेल. सोबत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा डिवाइस Android 12 वर आधारित OxygenOS 12 वर काम करेल.  

OnePlus 10R च्या मागे असेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर मिळू शकतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची Sony IMX355 अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो लेन्स देण्यात येईल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगर सेन्सरची सुरक्षा मिळते.  

हा पहिला वनप्लस डिवाइस असू शकतो ज्यात अलर्ट स्लायडर दिला जाणार नाही. फोनमध्ये Dolby Audio स्पीकर, NFC आणि High-Res Audio असे फीचर्स मिळतील. या फोनमध्ये 4500mAh बॅटरी असू शकते, जी 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा चार्जिंग स्पीड Realme GT Neo 3 मध्ये देखील मिळाला होता. रिपोर्टनुसार, रियलमीच्या फोन प्रमाणेच वनप्लस देखील या फोनचा 5000mAh बॅटरी आणि 80W चार्जिंग स्पीड असलेला अजून एक व्हर्जन सादर करू शकते.    

Web Title: OnePlus 10R Smartphone Design Shown In Amazon Ad Ahead Of launch  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.