हे काय चाललंय काय? फोन रियलमीचा पण नाव OnePlus चं? OnePlus 10R च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

By सिद्धेश जाधव | Published: March 26, 2022 06:35 PM2022-03-26T18:35:09+5:302022-03-26T18:35:14+5:30

OnePlus 10R च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. हा स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो.  

OnePlus 10R Specifications Leaked Could Be Rebranded Version Of Realme GT Neo 3  | हे काय चाललंय काय? फोन रियलमीचा पण नाव OnePlus चं? OnePlus 10R च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

हे काय चाललंय काय? फोन रियलमीचा पण नाव OnePlus चं? OnePlus 10R च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Next

OnePlus यावर्षी भारतात सप्टेंबरपर्यंत 6 स्मार्टफोन सादर करणार आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. यात OnePlus 10R चा देखील समावेश आहे. कंपनीनं या स्मार्टफोनची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु 91Mobiles नं या आगामी वनप्लस स्मार्टफोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. हे स्पेसिफिकेशन्स पाहताच नुकताच लाँच झालेल्या Realme GT Neo 3 ची आठवण झाली. तसेच OnePlus 10R देखील हा फोन रियलमीच्या स्मार्टफोनचा रीब्रँड व्हर्जन असल्याचे दर्शवतो.  

OnePlus 10R चे लीक स्पेसिफिकेशन्स 

OnePlus 10R स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ ई4 अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात येईल. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि HDR 10+ ला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेटचा वापर करेल. सोबत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा डिवाइस Android 12 वर आधारित OxygenOS 12 वर काम करेल. 

OnePlus 10R च्या मागे असेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर मिळू शकतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची Sony IMX355 अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो लेन्स देण्यात येईल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगर सेन्सरची सुरक्षा मिळते.  

हा पहिला वनप्लस डिवाइस असू शकतो ज्यात अलर्ट स्लायडर दिला जाणार नाही. फोनमध्ये Dolby Audio स्पीकर, NFC आणि High-Res Audio असे फीचर्स मिळतील. या फोनमध्ये 4500mAh बॅटरी असू शकते, जी 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा चार्जिंग स्पीड Realme GT Neo 3 मध्ये देखील मिळाला होता. रिपोर्टनुसार, रियलमीच्या फोन प्रमाणेच वनप्लस देखील या फोनचा 5000mAh बॅटरी आणि 80W चार्जिंग स्पीड असलेला अजून एक व्हर्जन सादर करू शकते.  

Web Title: OnePlus 10R Specifications Leaked Could Be Rebranded Version Of Realme GT Neo 3 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.