OnePlus 10 Pro परवडत नाही? काळजी नको, तीच परफॉर्मन्स देणारा स्वस्त OnePlus 10R येतोय
By सिद्धेश जाधव | Published: January 24, 2022 12:32 PM2022-01-24T12:32:21+5:302022-01-24T12:32:42+5:30
OnePlus 10R Launch: वनप्लस OnePlus 10 Pro नंतर या सीरिजमध्ये आणखीन दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. ज्यात OnePlus 10R आणि OnePlus 10 सादर करणार आहे.
OnePlus नं काही दिवसांपूर्वी चीनमध्ये आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन OnePlus 10 Pro लाँच केला आहे. कंपनी या सीरिजमध्ये आणखीन दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. ज्यात OnePlus 10R आणि OnePlus 10 सादर करणार आहे. आता यातील आर व्हर्जनच्या काही स्पेक्सचा खुलासा AndroidCentral नं केला आहे. रिपोर्टनुसार, OnePlus 10R स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 चिपसेटसह बाजारात येईल.
OnePlus 10R स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाऊ शकतो. त्यानंतर भारतासह जगभरात हा फोन पदार्पण करेल. हा वनप्लस 10आर आणि वनप्लस 10 हे दोन्ही स्मार्टफोन 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत लाँच केले जाऊ शकतात. यातील आर व्हर्जनची किंमत OnePlus 9R इतकी असू शकते. भारतात हा स्मार्टफोन 37,000 रुपयांच्या आसपास लाँच केला जाऊ शकतो.
OnePlus 10R चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus या स्मार्टफोनसाठी मीडियाटेकच्या प्रोसेसरचा वापर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus 10R स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 SoC सह सादर केला जाऊ शकतो. जो वनप्लस 10 प्रो मधील Snapdragon 8 Gen 1 चिपसेट सारख्या कोर अरेजमेंटसह येतो. आणि सोबत या प्रोसेसरमध्ये ग्राफिक्ससाठी 10 कोर असलेला Mali-G710 GPU देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले मिळेल. या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा:
- भारतीयांसाठी येतोय दमदार स्वदेशी पर्याय; आकर्षक डिजाईन आलेल्या Micromax In Note 2 ची लाँच डेट आली समोर
- WhatsApp ग्रुप अॅडमिनचं काम सोपं नाही! या 5 चुका घडवू शकतात तुरुंगवास