फास्ट चार्जिंगचे सर्व विक्रम आपल्या नवे करण्याच्या मार्गवर OnePlus; नव्या फोनसोबत 160W चा फास्ट चार्जर
By सिद्धेश जाधव | Published: June 16, 2022 06:44 PM2022-06-16T18:44:41+5:302022-06-16T18:44:50+5:30
वनप्लसचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10T 160W फास्ट चार्जरसह बाजारात येऊ शकतो.
सध्या स्मार्टफोन सेगमेंटमध्ये सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असलेला फोन सादर करण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे, असं दिसतंय. काही महिन्यांपूर्वी रियलमी आणि वनप्लसने आपले 150W फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन सादर केले होते. आता त्यापेक्षा एक पाऊल पुढे जात आगामी OnePlus 10T स्मार्टफोन सोबत कंपनी 160W चा फास्ट चार्जर देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रसिद्ध टिपस्टर Digital Chat Station नं चिनी मायक्रोब्लॉगिंग साईट वीबोवरून आगामी वनप्लस 10टी स्मार्टफोनच्या मुख्य स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. फोनमध्ये OLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
OnePlus 10T चे लीक स्पेसिफिकेशन्स
लिकेनुसार, OnePlus 10T मध्ये 6.7 इंचाचा 10-bit OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा पंच होल डिजाईन, 2412 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. OnePlus 10T मध्ये Qualcomm चा लेटेस्ट फ्लॅगशिप प्रोसेसर 8+ Gen 1 दिला जाऊ शकतो. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेज मिळू शकते.
वनप्लसच्या या आगामी फ्लॅगशिप फोनच्या मागे तीन कॅमेरा सेन्सर असतील. फोनचा मुख्य कॅमेरा 50MP चा असेल. सोबत 8MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा असेल. यात NFC, मोटर ड्युअल स्पिकर, अंडर-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स मिळतील. Digital Chat Stattion नुसार, OnePlus 10T सोबत 160W चा चार्जर मिळेल. परंतु फोन 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल आणि यात 4800mAh ची बॅटरी मिळेल.