धमाल! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह OnePlus चा पावरफूल स्मार्टफोन लॉन्च, किंमत अन् फिचर्स जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 07:52 PM2023-01-04T19:52:38+5:302023-01-04T19:53:50+5:30
OnePlus 11 5G फोन लॉन्च झाला आहे. कंपनीचा हा आजवरचा सर्वात दमदार फोन आहे.
OnePlus 11 5G फोन लॉन्च झाला आहे. कंपनीचा हा आजवरचा सर्वात दमदार फोन आहे. भारतीय बाजारपेठेत पुढच्या महिन्यात हा फोन दाखल होईल. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.
OnePlus 11 5G फोनमध्ये ६.७ इंचाचा QHD+ E4 OLED स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तसंच HDR 10+ सह LTPO 3.0 चा सपोर्टही देण्यात आला आहे. फोनचा रिफ्रेश रेट कंटेन्टच्या आधारावर ऑटो मोडवर अॅडजस्ट होऊ शकतो.
OnePlus 11 5G Android 12 बेस्ड OxygenOS वर काम करतो. वनप्लसच्या या फोनसह 100W चा चार्जर रिटेल बॉक्समध्ये देण्यात आला आहे. पण फोनला वायरलेस चार्जिंग सुविधा देण्यात आलेली नाही. वॉटर आणि डस्ट रेसिस्टंससाठी फोनला IP54 रेटिंग देण्यात आलं आहे. तर फोनच्या बॅटरीची क्षमता तब्बल 5000mAh इतकी आहे. सिक्युरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं आहे. सोबत आयकॉनिक अलर्ट स्लाइड देण्यात आलं आहे.
OnePlus 11 5G ची किंमत किती?
वन प्लस ११ फाइव्ह-जी फोन सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात हा फोन ७ फेब्रुवारीला लॉन्च होमार आहे. याची सुरुवातीची किंमत ४८ हजार रुपये इतकी असणार आहे.