लाँचिंगपूर्वीच वनप्लस १२ ची माहिती लीक; 50 MP चे दोन कॅमेरे, एवढे फास्ट चार्जिंग की...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 09:57 PM2023-07-13T21:57:24+5:302023-07-13T21:57:48+5:30
एकाच कंपनीने वेगवेगळ्या आवडीच्या लोकांसाठी वेगवेगळे ब्रँड काढत भारतीयांवर चांगलीच मोहिनी घातली आहे. अशातच वनप्लसचा नवा १२ सिरीजचा फोन येत्या महिनाभरात लाँच केला जाणार आहे.
वनप्लसच्या स्मार्टफोननी भारतीयांना चांगलीच भुरळ घातली आहे. वनप्लसने अगदी साठ सत्तर हजार रुपयांपासून ते अगदी २० हजारापर्यंत स्मार्टफोन लाँच केलेले आहेत. एकाच कंपनीने वेगवेगळ्या आवडीच्या लोकांसाठी वेगवेगळे ब्रँड काढत भारतीयांवर चांगलीच मोहिनी घातली आहे. अशातच वनप्लसचा नवा १२ सिरीजचा फोन येत्या महिनाभरात लाँच केला जाणार आहे.
हा फोन लाँच होण्यापूर्वीच डिटेल्स लीक झाले आहेत. फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर १५० वॉटचे फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. यामुळे आठ-१० मिनिटांत हा फोन पूर्ण चार्ज होणार आहे. वनप्लसचा फोन हा प्रमिअम श्रेणीत येतो. याचे कॅमेरे चांगले असतात.
फोनमध्ये पेरिस्कोपिक कॅमेरा दिला जाऊ शकतो. Octa-core Snapdragon 8 Gen 3 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये Adreno 750 GPU सपोर्ट असेल. फोनमध्ये उत्तम गेमिंग आणि ग्राफिक्स सपोर्ट मिळेल. फोन 5000mAh बॅटरी सपोर्टसह येईल. फोनसोबत 150W फास्ट चार्जिंग अॅडॉप्टर उपलब्ध असेल.
OnePlus 12 स्मार्टफोनमध्ये 50-megapixel IMX9xx प्राइमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय Sony IMX989 कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. याशिवाय 64 मेगापिक्सलचा पेरिस्कोपिक कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 6.7-इंचाचा QHD OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. स्मार्टफोन 56,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.