OnePlus 6T Launch : आज भारतासाठी इव्हेंट; आयफोनला टक्कर पण किंमत तिपटीने कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 11:06 AM2018-10-30T11:06:09+5:302018-10-30T11:13:13+5:30

चीनच्या OnePlus कंपनीने सोमवारी न्युयॉर्कमध्ये अखेर नवा OnePlus 6T लाँच केला.

OnePlus 6T Launch: Event for India today; iPhone's rivalry but price is threefold low | OnePlus 6T Launch : आज भारतासाठी इव्हेंट; आयफोनला टक्कर पण किंमत तिपटीने कमी

OnePlus 6T Launch : आज भारतासाठी इव्हेंट; आयफोनला टक्कर पण किंमत तिपटीने कमी

Next

चीनच्या OnePlus कंपनीने सोमवारी न्युयॉर्कमध्ये अखेर नवा OnePlus 6T लाँच केला. आज हा फोन भारतात लाँच होणार आहे. नव्या मोबाइल मध्ये ड्रॉप नॉच डिस्प्ले, ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरसह ड्युल कॅमेरा दिला आहे. तसेच नवी ऑपरेटिंग सिस्टिम पाय देखील देण्यात आली आहे.


कॉर्निंग गोरिला ग्लास 6, 6.4 इंचाची ऑप्टिक अॅमोल्ड स्क्रीन 19.5:9 या अस्पेक्ट रेशोसह पाठीमागे 20 आणि 16 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा दिला आहे. फेस अनलॉक फिचरसह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरामध्ये सोनीचा IMX 371 सेन्सर वापरण्यात आला आहे. लो लाईट फोटोग्राफीसाठी फ्लॅशशिवाय चालणारे नाईटस्केप हे फिचर देण्यात आले आहे.




OnePlus 6T मध्ये 2.8GHz चा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 चा प्रोसेसर, 6 आणि 8 128 जीबी आणि 8/256 जीबी या दोन मॉडेलमध्ये उपलब्ध होणार आहे. फास्ट चार्जिंगसह 3700 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. अर्ध्या तासाच्या चार्जिंगमध्ये हा फोन दिवसभर चार्ज राहू शकतो. ऑक्सिजन ओएस अँड्रॉइड पायवर बनविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या फोनमध्ये 64 जीबीचा पर्याय नसणार आहे. 
OnePlus 6T मध्ये हेडफोन जॅक नाही. मात्र, USB-C चा 3.5 एमएम जॅक अॅडॅप्टर मिळणार आहे. या फोनला आयपी रेटींग देण्यात आलेले नाही. मात्र, या फोनला हलक्या पावसात भिजल्यावर काहीही होणार नसल्याचा दावा कंपनीने करतानाच पोहतेवेळी फोन पाण्यात न नेण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. 


वनप्लस 6T ची ग्लास बॉडी 40 प्रकारच्या चाचण्यांमधून गेली आहे. यामुळे सहजासहजी ती फुटणारी नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. 


आज भारतीयांसाठी इव्हेंट
भारतात आज रात्री 8.30 वाजता दिल्लीतील केडीजीडब्ल्यू स्टेडीअमवर हा लाँचिंग इव्हेंट होणार आहे. अॅमेझॉनवर हा मोबाईल 1 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार असून आगाऊ बुकिंग सुरु आहे. 1 हजार रुपयांमध्ये बुकिंग केल्यानंतर  1500 रुपयांचा टाईप-सी बुलेट हेडफोन मोफत मिळणार आहे. तसेच 500 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. तसेच जिओ अॅपवर 5400 रुपयांचा कॅशबॅक, सिटी आणि आयसीआयसीआय बँकेकडून 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. अॅमेझॉन पेवर 1000 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. 


या बँककडून मोफत अॅक्सिडेंटल इन्शुरन्स
कोटक 811 बँकेमध्ये नवे खाते उघडल्यास वनप्लस मोबाईलसाठी 2000 रुपयांचा अॅक्सिडेंटल आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन इन्शुरन्स मिळणार आहे. नो कॉस्ट ईएमआयसाठी सर्व महत्वाच्या बँक सुविधा देणार आहेत.
 

Web Title: OnePlus 6T Launch: Event for India today; iPhone's rivalry but price is threefold low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.