OnePlus 7 आणि 7 Pro आज लाँच होणार; 6 टी पेक्षा महाग असण्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:47 PM2019-05-14T13:47:32+5:302019-05-14T13:49:02+5:30
भारतात बेंगळुरुमध्ये रात्री 8.15 वाजता लाँचिंग सुरु होणार आहे.
चीनची प्रिमिअम स्मार्टफोन कंपनी OnePlus आज भारतासह जगभरात त्यांचे नवे वनप्लस 7 आणि वनप्लस 7 प्रो लाँच करणार आहे. भारतात बेंगळुरुमध्ये रात्री 8.15 वाजता लाँचिंग सुरु होणार आहे. या दोन्ही फोनचे फिचर्स काही दिवसांपासून लीक होत आहेत. मात्र, योग्य फिचर्स लाँचिंगवेळीच समोर येणार आहेत. वनप्लस 7 श्रेणीमध्ये तीन फोन लाँच होणार आहेत. या फोनची किंमतीबाबतही अफवा असून वनप्लस 6 टी पेक्षा महाग असण्याची शक्यता आहे.
वनप्लस 7 प्रो चे व्हेरिअंट और कीमत (अंदाजे)
6GB रॅम + 128GB स्टोरेज : 49,999 रुपए
8GB रॅम + 256GB स्टोरेज : 52,999 रुपए
12GB रॅम + 256GB स्टोरेज : 57,999 रुपए
वनप्लस 7मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहे. यामध्ये मोठी बॅटरी, 30 वॅटचा चार्जर असणार आहे. तर वनप्लस 7 प्रोमध्ये अल्ट्रावाईड कॅमेरा लेन्स, पावरफूल बॅटरी, पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 12 जीबीची रॅम असणार आहे.
वनप्लस मोबाईलची उत्सुकता असली तरीही ही पहिलीच वेळ आहे की, लाँचिंगआधीच एवढी सारी माहिती फुटली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले असेल. तर फोनला स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट देण्यात आला आहे.
वनप्लसचे फोन कॅमेरासाठी ओळखले जातात. यामुळे या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा सोनीचा IMX586 सेन्सर कॅमेरा देण्यात येणार आहे. तर सेकंडरी कॅमेराद्वारे टेलिफोटो शूटर मिळणार आहे. तिसरा कॅमेरा केवळ वनप्लस 7 प्रो मध्येच असेल. यामध्ये वाईड अँगल सेन्सर देण्यात येणार आहे.
OnePlus 7 मध्ये 5जी सपोर्ट देणारा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 एसओसीसह लाँच केला जाणार आहे. हा प्रोसेसर गेल्या वर्षीच्या मोबाईल काँग्रेसमध्ये लाँच झाल्यावेळीच OnePlus 7 चे पेटे लाऊ यांनी हा प्रोसेसर नव्या मोबाईलमध्ये वापरणार असल्याचे म्हटले होते. या फोनचा डिस्प्ले फुल QHD+ असू शकतो.