अरारारा खतरनाक! 10 हजारांपेक्षा जास्त कपात; स्वस्तात मिळवा OnePlus दोन दमदार 5G स्मार्टफोन्स

By सिद्धेश जाधव | Published: April 2, 2022 06:41 PM2022-04-02T18:41:08+5:302022-04-02T18:42:24+5:30

OnePlus 10 Pro 5G च्या लाँचनंतर कंपनीनं OnePlus 9 सीरिजच्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे.  

OnePlus 9 5G And OnePlus 9 Pro 5G Price Cut Of More Than 10000 Rupees   | अरारारा खतरनाक! 10 हजारांपेक्षा जास्त कपात; स्वस्तात मिळवा OnePlus दोन दमदार 5G स्मार्टफोन्स

अरारारा खतरनाक! 10 हजारांपेक्षा जास्त कपात; स्वस्तात मिळवा OnePlus दोन दमदार 5G स्मार्टफोन्स

Next

OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोन भारतात आल्यामुळे वनप्लसच्या चाहत्यांचा फायदाच झाला आहे. ज्यांना हा फोन विकत घेणं परवडतंय ते या फोनच्या सेलची वाट बघत आहेत. तर अन्य ग्राहक जुन्या वनप्लस मॉडेल्सवर मिळणारा डिस्काउंटचा फायदा घेत आहेत. आता कंपनीनं OnePlus 9 Pro 5G च्या किंमतीत पुन्हा एकदा कपात केली आहे. तसेच OnePlus 9 5G ची किंमत देखील कमी झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही हे डिवाइस विकत घेण्याचा विचार करत असाल तर या कपातीचा फायदा घेऊ शकता.  

OnePlus 9 सीरिजची किंमत झाली कमी  

OnePlus 9 Pro 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत 64,999 रुपये आहे, जों आता 54,199 रुपयांमध्ये मिळत आहेत. तर 12GB रॅम व 256GB मॉडेल 69,999 रुपयांच्या ऐवजी 59,199 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

OnePlus 9 5G चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात 49,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता, जो आता 40,599 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12GB रॅम व 256GB स्टोरेजसाठी तुम्हाला आता 54,999 रुपयांच्या ऐवजी 45,999 रुपये द्यावे लागतील.  

OnePlus 9 Pro 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स  

OnePlus 9 Pro मध्ये कंपनीनं 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 3216x1400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे. डिवाइस Andriod 11 आधारित वनप्लस ऑक्सीजन ओएसवर चालतो. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

OnePlus 9 Pro मध्ये मागील बाजूला 4 कॅमेरे आहेत. या स्मार्टफोनचादेखील मेन कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय यात 50 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 8 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. OnePlus 9 Pro हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसह येतो. पावर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 65W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.   

Web Title: OnePlus 9 5G And OnePlus 9 Pro 5G Price Cut Of More Than 10000 Rupees  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.