पटापट संपतोय OnePlus च्या 5G फोनचा स्टॉक; पहिल्यांदाच मिळतोय 11 हजार रुपयांचा डिस्काउंट
By सिद्धेश जाधव | Published: March 17, 2022 05:55 PM2022-03-17T17:55:03+5:302022-03-17T17:55:13+5:30
OnePlus 9 5G हा फोन 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग आणि 5G सह ग्राहकांच्या भेटीला आला आहे, जो स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळत आहे.
वनप्लस लवकरच भारतात आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन OnePlus 10 Pro सादर करू शकते. तसेच कंपनी बजेट सेगमेंटमध्ये देखील आपला जलवा दाखवणार आहे. परंतु त्याआधी कंपनीचा फ्लॅगशिप OnePlus 9 5G स्मार्टफोन स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळत आहे. हा फोन 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग आणि 5G सह ग्राहकांच्या भेटीला आला आहे.
अॅमेझॉनची ऑफर
अॅमेझॉनवर OnePlus 9 5G स्मार्टफोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल 44,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. परंतु जर तुम्ही सिटी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून ऑर्डर दिली तर तुम्हाला 8 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन देऊन एक्सचेंज ऑफर अंतर्गत 3 हजार रुपयांची बचत देखील करू शकता. त्यामुळे सुमारे 45 हजारांचा हा फोन 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
OnePlus 9 5G चे स्पेसिफिकेशन
OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिजोल्यूशन 2400x1080 पिक्सल आहे. फोनचा डिस्प्ले हा 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटसह येतो. OnePlus 9 मध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. OnePlus 9 मध्ये 65W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर 12 GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
OnePlus 9 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. यातील मेन कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर देण्यात आला आहे. यात व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे.