कायमस्वरूपी 10 हजारांची कपात! OnePlus चे दमदार 5G Smartphones झाले स्वस्त
By सिद्धेश जाधव | Published: May 11, 2022 12:51 PM2022-05-11T12:51:37+5:302022-05-11T12:51:56+5:30
OnePlus 9 चे दोन व्हेरिएंट 8GB/128GB आणि 12GB/256GB सह येतात या फोन्सच्या किंमत कंपनीनं 7,000 रुपयांची कपात केली आहे.
OnePlus नं वनप्लस 9 सीरीजमधील OnePlus 9 Pro 5G आणि OnePlus 9 च्या किंमतीत कायमस्वरूपी कपात केली आहे. हे फोन्स आता 10,000 रुपयांपर्यंत स्वस्तात विकत घेता येतील, अशी माहिती 91मोबाईल्सनं रिटेल सोर्सच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही वनप्लसचा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर या फोन्सचा विचार करू शकता.
OnePlus 9 Pro 5G आणि OnePlus 9 ची नवीन किंमत
OnePlus 9 Pro 5G स्मार्टफोनचा 8GB/128GB व्हेरिएंट 54, 199 रुपयांच्या ऐवजी आता 44,199 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर OnePlus 9 Pro 5G स्मार्टफोनचा 12GB/256GB मॉडेल 59,199 रुपयांमध्ये लाँच झाला होता जो 49,199 रुपयांमध्ये मिळेल. यांची किंमत 10 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
OnePlus 9 चे दोन व्हेरिएंट 8GB/128GB आणि 12GB/256GB सह येतात या फोन्सच्या किंमत कंपनीनं 7,000 रुपयांची कपात केली आहे.
OnePlus 9 5G चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9 5G मध्ये कंपनीनं 6.55 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 3D गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह येतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे. डिवाइस Andriod 11 आधारित वनप्लस ऑक्सीजन ओएस 11 वर चालतो. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.
OnePlus 9 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या स्मार्टफोनचा मेन कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय यात 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
OnePlus 9 Pro 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9 Pro मध्ये कंपनीनं 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 3216x1400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे. डिवाइस Andriod 11 आधारित वनप्लस ऑक्सीजन ओएसवर चालतो. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.
OnePlus 9 Pro मध्ये मागील बाजूला 4 कॅमेरे आहेत. या स्मार्टफोनचादेखील मेन कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय यात 50 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 8 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. OnePlus 9 Pro हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसह येतो. पावर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 65W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.