जुना स्टॉक संपवण्यासाठी डिस्काउंट? OnePlus च्या सर्वात पावरफुल 5G फोनच्या किंमतीत कपात  

By सिद्धेश जाधव | Published: March 29, 2022 01:16 PM2022-03-29T13:16:54+5:302022-03-29T13:17:01+5:30

OnePlus 5G Smartphone च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. ही कपात आगामी वनप्लस 10 प्रो मुळे करण्यात आली असावी, अशी चर्चा आहे.  

OnePlus 9 Pro Price In India Reduced By Rs 5000 Check New Price  | जुना स्टॉक संपवण्यासाठी डिस्काउंट? OnePlus च्या सर्वात पावरफुल 5G फोनच्या किंमतीत कपात  

जुना स्टॉक संपवण्यासाठी डिस्काउंट? OnePlus च्या सर्वात पावरफुल 5G फोनच्या किंमतीत कपात  

Next

OnePlus चा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10 Pro भारतात येत्या 31 मार्चला येणार आहे. कदाचित त्यामुळेच कंपनी जुन्या फ्लॅगशिपचा स्टॉक संपवण्याच्या मागे लागली आहे. OnePlus नं गेल्यावर्षी आलेल्या सर्वात पावरफुल 5G Smartphone अर्थात वनप्लस 9 प्रो ची किंमत कमी केली आहे. या वनप्लस मॉडेलच्या किंमतीत 5000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 

OnePlus 9 Pro ची नवीन किंमत 

कंपनीनं 5000 रुपयांची कपात केल्यानंतर OnePlus 9 Pro स्मार्टफोनचा 8 जीबी रॅम व 128 जीबी व्हेरिएंट 59,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे, ज्याची किंमत 64,999 रुपये होती. तर 69,999 रुपयांचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेल हातात 64,999 रुपयांमध्ये कंपनीच्या वेबसाईटसह Amazon वर लिस्ट करण्यात आला आहे. 

OnePlus 9 Pro 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स  

OnePlus 9 Pro मध्ये कंपनीनं 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 3216x1400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे. डिवाइस Andriod 11 आधारित वनप्लस ऑक्सीजन ओएसवर चालतो. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

OnePlus 9 Pro मध्ये मागील बाजूला 4 कॅमेरे आहेत. या स्मार्टफोनचादेखील मेन कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय यात 50 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 8 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. OnePlus 9 Pro हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसह येतो. पावर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 65W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: OnePlus 9 Pro Price In India Reduced By Rs 5000 Check New Price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.