OnePlus 9 RT स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये येऊ शकतो भारतात; OnePlus 9T होणार का सादर?  

By सिद्धेश जाधव | Published: August 20, 2021 03:03 PM2021-08-20T15:03:05+5:302021-08-20T15:08:58+5:30

OnePlus 9 RT Launch: कंपनी OnePlus 9 RT वर काम करत असून हा फोन ऑक्टोबरमध्ये भारतात सादर केला जाईल.

OnePlus 9 RT to launch in india in october with oxygenOS 12  | OnePlus 9 RT स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये येऊ शकतो भारतात; OnePlus 9T होणार का सादर?  

हा प्रतीकात्मक फोटो आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देOnePlus 9 RT मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870प्लस चिपसेट मिळू शकतो.

OnePlus आपल्या OnePlus 9 सीरिजमधील आगामी स्मार्टफोन OnePlus 9T सादर करणे अपेक्षित होते. या बातमीला कंपनीच्या एका ट्विटमुळे दुजोरा देखील मिळाला होता. परंतु आज वनप्लससंबंधित नवीन बातमी समोर आली आहे. आज आलेल्या माहितीनुसार कंपनीच्या नव्या स्मार्टफोनचे नाव OnePlus 9 RT असेल. OnePlus 9T स्मार्टफोनचा लाँचची माहिती मात्र अजूनही अस्पष्टच आहे.  

स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसच्या आगामी स्मार्टफोन OnePlus 9 RT च्या लाँचची माहिती टेक वेबसाइट अँड्रॉइड सेंट्रलने दिली आहे. कंपनी OnePlus 9 RT वर काम करत असून हा फोन ऑक्टोबरमध्ये भारतात सादर केला जाईल, अशी माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे. हा स्मार्टफोन वनप्लस 9 सीरीजमधील OnePlus 9R, अपग्रेडेड व्हर्जन असेल. हे देखील वाचा: आता टेम्परेचर गनचे देखील काम करणार स्मार्टफोन! 8500mAh बॅटरी आणि बिल्टइन थर्मामीटरसह आला हा स्मार्टफोन

OnePlus 9 RT चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

OnePlus 9 RT मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित आक्सिजनओएस 12 वर चालेल. हा फोन OxygenOS 12 सह लाँच होणारा पहिला स्मार्टफोन असेल. रिपोर्टनुसार या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870प्लस चिपसेट मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी या वनप्लस फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात येईल. वनप्लस 9 आरटी मधील 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.  हे देखील वाचा: अरे वा! काही मिनिटांत फुल चार्ज होणार होणार हा स्मार्टफोन; 120W फास्ट चार्जिंगसह आला iQOO 8 5G

OnePlus Gifting Days 

OnePlus ने भारतात OnePlus Gifting Days सेलची सुरुवात केली आहे. हा सेल 12 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान सुरु राहील. या सेल अंतर्गत वनप्लस डिव्हाइसेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वनप्लस स्मार्टफोन आणि टीव्ही जिंकण्याची संधी मिळेल. ही ऑफर फक्त ऑफलाईन वनप्लस एक्सपेरियन्स स्टोर्स आणि पारनेर स्टोर्सवरून खरेदी केलेल्या डिव्हाइसेसवर लागू असेल. कंपनी लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्यांची निवड करणार आहे. 

Web Title: OnePlus 9 RT to launch in india in october with oxygenOS 12 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.