केवळ 10 सेकंदात OnePlus9 च्या 330 कोटी रूपयांपेक्षा अधिक फोनची विक्री; पाहा डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 03:51 PM2021-03-31T15:51:52+5:302021-03-31T15:54:49+5:30
OnePlus9 : 30 मार्चला झाला होता स्मार्टफोनचा पहिला सेल, १० सेकंदात ३३० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या स्मार्टफोन्सची विक्री
काही दिवसांपूर्वीच OnePlus नं आपल्या एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये OnePlus 9 Series चे स्मार्टफोन्सलाँच केले होते. कंपनीनं या सीरिजमध्ये OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9R हे फोन बाजारात आणले आहेत. OnePlus 9 या स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत 49,900 रूपये इतकी आहे. तर OnePlus 9 Pro ची सुरूवातीची किंमत 64,999 रूपये इतकी आहे. दोन्ही फोनमध्ये जवळपास 15 हजार रूपयांचं अंतर आहे.
दरम्यान, OnePlus च्या या स्मार्टफोन्सची विक्रीमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या स्मार्टफोन्सची विक्री 330 कोटी रूपयांच्या पुढे गेली आहे. 30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता या स्मार्टफोनचा पहिला सेल सुरू झाला आणि 10 सेकंदातच विक्रम प्रस्थापित झाला. OnePlus नं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या सेलमध्ये जवळपास 300 दशलक्ष युआन म्हणजेच अंदाजे ३३६ कोची रूपयांच्या OnePlus9 सीरिजच्या फोन्सची विक्री झाली. दरम्यान, यात कंपनीनं किती युनिट्सची विक्री केली याची माहिती मात्र दिली नाही.
काय आहे या स्मार्टफोनमध्ये खास?
OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिझॉल्युशन 2400*1080 पिक्सेल आहे. फोनचा डिस्प्ले हा 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटसह येतो. या स्मार्टफोनचं वजन 192 ग्राम इतकं आहे. तर OnePlus 9 Pro मध्ये कंपनीनं 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. याचं रिझॉल्युशन 3216*1400 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या स्मार्टफोनचं वजन 197 ग्राम आहे.
रिअर कॅमेरा सेटअपमध्ये फरक
OnePlus 9 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. तर यातील मेन कॅमेरा हा 48 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा मोनोक्रोम सेन्सर देणअयात आला आहे. OnePlus 9 Pro मध्ये मागील बाजूला 4 कॅमेरे आहेत. या स्मार्टफोनचादेखील मेन कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय यात 50 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 8 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे.
बॅटरी आणि वायरलेस चार्जिग
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. OnePlus 9 मध्ये 65W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तर OnePlus 9 Pro मध्ये 65W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. OnePlus 9 हा स्मार्टफोन वॉटरप्रुफ नाही. तर OnePlus 9 Pro हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसह येतो.
किती आहे किंमत?
OnePlus 9 ची सुरूवातीची किंमत 49,999 रूपये इतकी आहे. ही किंमत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वाल्या स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 54,999 रूपये आहे. OnePlus 9 Pro च्या सुरुवातीच्या म्हणजेच 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 644,999 रूपये इतकी आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 69,999 रूपये आहे.
OnePlus 9R हा स्मार्टफोन गेमर्ससाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये OLED पॅनल देण्यात आलं असून त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz इतका आहे. यामध्ये Snapdragon 870 हा प्रोसेसर देण्यात आला असून तो 8/128जीबी आणि 12/256 जीबी रॅमसह येतो.