OnePlus 9 सीरिजचे स्मार्टफोन्स २३ मार्चला होणार लाँच; याचा कॅमेरा आणि 'नासा'चा संबंध माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 06:31 PM2021-03-08T18:31:28+5:302021-03-08T18:38:15+5:30
OnePlus 9 Series : जबरदस्त कॅमेऱ्यासह स्मार्टफोन लवकरच होणार लाँच
दिग्गज स्मार्टफोन कंपनी OnePlus चे 9 सीरिजचे स्मार्टफोन्स लवकरच लाँच होणार आहेत. कंपनीनं याची घोषणा केली असून 23 मार्च रोजी हे स्मार्टफोन्स लाँच केले जातील. एका ग्लोबल इव्हेंटमध्ये या सीरिजचे स्मार्टफोन्स लाँच केले जातील. तसंच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता हे लाँच इव्हेंट सुरू होईल, OnePlus 9 सीरिजसह कंपनी OnePlus Watch देखील लाँच करण्याची शक्यता आहे. लाँचच्या तारखेव्यतिरिक्त कंपनीनं या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दलही मोठा खुलासा केला आहे. OnePlus 9 या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये Hasselblad कंपनीचा कॅमेरा असणार आहे. Hasselblad आणि नासानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं याचा खुप जवळचा संबंध आहे. कारण त्यावेळी Hasselblad कंपनीच्या कॅमेऱ्यानंच चंद्रावरील फोटो काढण्यात आले होते.
दरम्यान, आपल्या स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्याला अधिक उत्तम बनवण्यासाठी OnePlus पुढील तीन वर्षांमध्ये 150 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार कंपनी OnePlus 9 सीरिजचे तीन मॉडेल्स लाँच करू शकते. याणध्ये OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus9e या स्मार्टफोन्सचा समावेश असू शकतो. तसंच या स्मार्टफोन्ससोबत चार्जरही देण्यात येणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
असा असेल कॅमेरा
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार OnePlus 9 सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये 140 डिग्रीच्या फ्लिल्ड ऑफ व्ह्यूसोबत पॅनोरमिक कॅमेरा, तसंत फ्रन्ट फेसिंग कॅमेऱ्यात तेजीनं फोकस करण्यासाठी T-Lens टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय या स्मार्टफोन्समध्ये अल्ट्रा वाईड फोटोंसाठी विशेष लेन्स देण्यात आली आहे. व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर Hasselblad कॅमेरा उत्तम HDR व्हिडीओ रेकॉर्डिंग 120FPS वर 4K आणि 30FPS वर 8K व्हिडीओ रकॉर्डिंग सपोर्ट करेल.
याशिवाय फोनमध्ये नवा Hasselblad Pro Mode देखील असेल. यामुळे युझर्सना नवा इंटरफेस आणि कॅमेऱ्यावर अधिक कंट्रोल मिळेल. दरम्यान, OnePlus चा प्रायमरी कॅमरा Sony IMX789 सेन्सर असेल. हा पहिल्यापेक्षा 64 टक्के अधिक कलरफुल असेल असा दावा कंपनीनं केला आहे. या शिवाय फोटोमध्ये अधिक डायनॅमिक आणि वायब्रंट कलर्स पाहायला मिळतील.
कॅमेरा आणि नासाचा काय संबंध ?
चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवण्याच्या घटनेला 20 जुलैला 50 वर्षे पूर्ण झाली. त्याआधी म्हणजेच 18 जुलै 1969 ला नासाच्या यानाने चंद्राकडे झेप घेतली होती. या ऐतिहासिक घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे या सुवर्ण महोत्सवी वर्षाला नासाने रोमांचकारी असे 400 फोटो प्रसिद्ध केले होते. चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले? नील आर्मस्ट्राँगने. पण या नील आर्मस्ट्राँगसोबत आणखी दोघेजण या मोहिमेवर होते. आर्मस्ट्राँग यांनी पहिले पाऊल ठेवले, पण दुसरे पाऊल कोणी ठेवले याबाबत माहिती नसेल. या व्यक्तीचे नाव होते एल्ड्रिन. चंद्रावर पाऊल ठेवतानाचा फोटो आर्मस्ट्राँगॉचा नाही तर एल्ड्रिन यांचा आहे. कारण तेव्हा आर्मस्ट्रॉन्गच कॅमेरा हाताळत होते.
पन्नास वर्षांपूर्वी कोणता कॅमेरा होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर तेव्हाच्या उच्च दर्जाच्या Hasselblad कॅमेरामधून हे फोटो काढण्यात आले आहेत. हे कॅमेरे स्वीडनमध्ये बनविले जातात. एल्ड्रिन यांच्या पावलाचे ठसे आजही चंद्रावर आहेत. कारण तेथे वायूमंडळ नाही तसेच पाऊसही पडत नाही.