12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT 5G लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर 

By सिद्धेश जाधव | Published: January 14, 2022 06:39 PM2022-01-14T18:39:41+5:302022-01-14T18:39:56+5:30

OnePlus 9RT Price: OnePlus 9RT देशात Qualcomm Snapdragon 888 चिपसेट, 120Hz रिफ्रेश रेट. OLED डिस्प्ले, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंग, अशा दर्जेदार स्पेसिफिकेशन्ससह अवतरला आहे.  

Oneplus 9rt 5g launched india with snapdragon 888 50mp camera 12gb ram price sale amazon india  | 12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT 5G लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर 

12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT 5G लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर 

Next

OnePlus च्या स्मार्टफोनची भारतीयांनी गेले कित्येक दिवस वाट पहिली होती तो म्हणजे OnePlus 9RT. अखेरीस हा फोन देशातील वनप्लस चाहत्यांच्या भेटीला अधिकृतपणे आला आहे. OnePlus 9RT देशात Qualcomm Snapdragon 888 चिपसेट, 120Hz रिफ्रेश रेट. OLED डिस्प्ले, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंग, अशा दर्जेदार स्पेसिफिकेशन्ससह अवतरला आहे.  

OnePlus 9RT Price 

भारतात OnePlus 9RT चे दोन व्हेरिएंट लाँच झाले आहेत. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी 46,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन ब्लॅक आणि सिल्वर कलरमध्ये 17 जानेवारीला दुपारी 12 वाजल्यापासून Amazon india आणि ऑफलाइन स्टोर्सवर विकत घेता येईल. 

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स 

OnePlus 9RT मध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. यात ग्राफिक्ससाठी एड्रेनो 660 जीपीयू मिळतो. सोबत 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS वर चालतो. OnePlus 9RT मधील 4,500mAh ची ड्युअल-सेल बॅटरी 65W Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

OnePlus 9RT मध्ये 6.62 इंचाचा फुल एचडी+ E4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 600Hz टच रिस्पॉन्सला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा Sony IMX471 सेल्फी शुटर देण्यात आला आहे.   

हे देखील वाचा:

4 हजारांपेक्षा कमी किंमतीत Realme चा दमदार Smart TV घरी आणण्याची संधी; अशी आहे ऑफर

हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket

Web Title: Oneplus 9rt 5g launched india with snapdragon 888 50mp camera 12gb ram price sale amazon india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.