पॉवरफुल OnePlus 9RT इतक्या रुपयांमध्ये होऊ शकतो भारतात सादर; लाँचपूर्वीच किंमतीचा खुलासा 

By सिद्धेश जाधव | Published: October 16, 2021 03:01 PM2021-10-16T15:01:32+5:302021-10-16T15:02:08+5:30

OnePlus 9RT Price In India And Launch Date: OnePlus 9RT चे तीन व्हेरिएंट चीनमध्ये सादर झाले आहेत, तिथे या फोनची किंमत सुमारे 41,000 भारतीय रुपयांच्या आसपास सुरु होत आहे.

OnePlus 9RT leaked India Price specs launch date  | पॉवरफुल OnePlus 9RT इतक्या रुपयांमध्ये होऊ शकतो भारतात सादर; लाँचपूर्वीच किंमतीचा खुलासा 

पॉवरफुल OnePlus 9RT इतक्या रुपयांमध्ये होऊ शकतो भारतात सादर; लाँचपूर्वीच किंमतीचा खुलासा 

googlenewsNext

वनप्लस मोबाईलने या आठवड्यात आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 9RT चीनमध्ये लाँच केला आहे. हा 5G Phone, Snapdragon 888 चिपसेट, 120Hz Refresh Rate, OLED डिस्प्ले, 50MP Camera आणि 65W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आला आहे. जागतिक लाँचची बातमी आल्यापासून भारतीय फॅन्स OnePlus 9RT च्या देशातील लाँचची आतुरतेने वाट बघत आहेत. वनप्लस इंडियाने या फोनच्या लाँचची माहिती दिली नाही, परंतु लीकच्या माध्यमातून OnePlus 9RT ची देशातील संभाव्य किंमत समोर आली आहे. 

OnePlus 9RT Price In India (भारतातील किंमत)  

वनप्लस 9आरटी च्या भारतीय किंमतीची माहिती टिपस्टर योगेश बरारने दिली आहे. त्यानुसार OnePlus 9RT भारतात 40 ते 44 हजार रुपयांच्या दरम्यान सादर केला जाऊ शकतो. टिपस्टरनुसार हा फोन OnePlus 8T च्या किंमतीत सादर केला जाईल. OnePlus 9RT चे किती व्हेरिएंट्स देशात एंट्री घेतील, याची माहिती मात्र अजूनही समजली नाही. चीनमध्ये या फोनचे तीन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे तिथे या फोनची किंमत सुमारे 41,000 भारतीय रुपयांच्या आसपास सुरु होत आहे.  

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स  

OnePlus 9RT मध्ये 6.62-चाचा फुल एचडी+ E4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. विशेष म्हणजे हा फोन OxygenOS ऐवजी अँड्रॉइड 11 आधारित Oppo च्या ColorOS वर चालतो.   

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा Sony IMX471 सेल्फी शुटर देण्यात आला आहे. OnePlus 9RT मधील 4,500mAh ची ड्युअल-सेल बॅटरी 65W Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.   

Web Title: OnePlus 9RT leaked India Price specs launch date 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.