OnePlus च्या धमाकेदार 5G Phone वर 4 हजारांची सूट; OnePlus 9RT स्वस्तात मिळवण्यासाठी करा इतकंच...
By सिद्धेश जाधव | Published: January 17, 2022 01:21 PM2022-01-17T13:21:30+5:302022-01-17T13:21:37+5:30
OnePlus 9RT Price In India: या फोनचे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसाठी 46,999 रुपये मोजावे लागतील.
OnePlus 9RT सध्या खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन अॅमेझॉन इंडियाच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल. 12GB RAM, 50MP camera, 65W फास्ट चार्जिंग आणि Snapdragon 888 चिपसेट असलेला हा स्मार्टफोन डिस्काउंटसह विकत घेता येईल.
OnePlus 9RT Price In India
या फोनचे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसाठी 46,999 रुपये मोजावे लागतील. परंतु हा स्मार्टफोन विकत घेताना जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर हा डिस्काउंट कोटक आणि अॅक्सिस बँकेच्या कार्डवर देखील उपलब्ध आहे.
OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9RT मध्ये 6.62 इंचाचा फुल एचडी+ E4 अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 600Hz टच रिस्पॉन्सला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा Sony IMX471 सेल्फी शुटर देण्यात आला आहे.
OnePlus 9RT मध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. यात ग्राफिक्ससाठी एड्रेनो 660 जीपीयू मिळतो. सोबत 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS वर चालतो. OnePlus 9RT मधील 4,500mAh ची ड्युअल-सेल बॅटरी 65W Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
हे देखील वाचा: