वनप्लसच्या स्मार्टफोन्सला ओप्पोचा आधार? 108 MP कॅमेरा आणि ColorOS 11 येऊ शकतो OnePlus 9T
By सिद्धेश जाधव | Published: July 3, 2021 01:02 PM2021-07-03T13:02:20+5:302021-07-03T13:07:37+5:30
OnePlus 9T with ColorOS 11: OnePlus 9T 5G मध्ये Oxygen OS ऐवजी ColorOS 11 आणि 108-मेगापिक्सलचा Hasselblad क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.
OnePlus सध्या वनप्लस 9 सीरिजमधील आगामी स्मार्टफोन्सची तयारी करत आहे. Oneplus 9 नंतर या सीरिजमध्ये OnePlus 9T लाँच केला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. कंपनी हा स्मार्टफोन तिसऱ्या तिमाहीत लाँच करू शकते, असे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. तसेच OnePlus 9T 5G स्मार्टफोनमध्ये ओप्पोची ऑपरेटिंग सिस्टम देण्यात येईल, असा दावा देखील लिक्समध्ये करण्यात आला आहे. OnePlus 9T 5G मध्ये Oxygen OS ऐवजी ColorOS 11 आणि 108-मेगापिक्सलचा Hasselblad क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. (OnePlus 9T with ColorOS 11, 108MP Hasselblad quad cameras)
Oneplus 9T 5G Coming Soon in Q3
— Savage inside (@imailisa0825) July 2, 2021
So 9T iS have color os 11 Global and 108 MP Hasselblad Quad Camera pic.twitter.com/JVMDkfyLJ2
OnePlus 9T चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लीक रिपोर्ट्सनुसार OnePlus 9T मध्ये LTPO Samsung E4 फ्लेक्सिबल अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. या डिस्प्लेमध्ये फुल एचडी+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. OnePlus 9T मध्ये क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 SoC मिळू शकते. कंपनीने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये OnePlus 8T लाँच केला होता. त्यामुळे वनप्लस 9T स्मार्टफोन तिसऱ्या तिमाहीत किंवा सप्टेंबरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. याच काळात वनप्लसचा OnePlus Nord 2 देखील बाजारात दाखल होऊ शकतो.
OnePlus Nord 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
याआधी आलेल्या वनप्लस नॉर्ड 2 संबंधित लिक्सनुसार, Nord 2 मध्ये Dimensity 1200 चिपसेट आणि 12GB पर्यंत रॅम मिळेल. या फोन मध्ये 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले असेल, हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो. वनप्लसच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर आणि 8GB RAM असेल.
OnePlus Nord 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यात मेन कॅमेरा 50MP चा असू शकतो. सोबत 8MP आणि 2MP चा अजून दोन सेन्सर असतील. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. OnePlus Nord 2 मध्ये 4500mAh ची बॅटरी असू शकते, ही बॅटरी 30W किंवा 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वनप्लस नॉर्ड 2 ची किंमत 22500 रुपये असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे.