याआधी कधीच न पाहिलेला OnePlus चा स्मार्टफोन दिसला वेबसाईटवर; 150W फास्ट चार्जिंगसह घेणार एंट्री 

By सिद्धेश जाधव | Updated: April 11, 2022 15:39 IST2022-04-11T15:39:40+5:302022-04-11T15:39:57+5:30

OnePlus Ace नावाचा स्मार्टफोन लवकरच 150W फास्ट चार्जिंग, MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आणि 12GB RAM सह सादर केला जाऊ शकतो. 

OnePlus Ace Geekbench Listing Reveals Mediatek Dimensity 8100 Soc And 150w Charging  | याआधी कधीच न पाहिलेला OnePlus चा स्मार्टफोन दिसला वेबसाईटवर; 150W फास्ट चार्जिंगसह घेणार एंट्री 

याआधी कधीच न पाहिलेला OnePlus चा स्मार्टफोन दिसला वेबसाईटवर; 150W फास्ट चार्जिंगसह घेणार एंट्री 

OnePlus चा यंदा एक वेगळाच अवतार समोर आला आहे. चीनमध्ये कंपनीचे स्मार्टफोन्स ओप्पोच्या ऑपरेटिंग सिस्टमसह सादर झाले आहेत. काही निवडक मॉडेल्स सादर करणारी कंपनी भारतात 6 फोन्स सादर करणार आहे. आता तर याआधी कधीच समोर न आलेल्या OnePlus Ace ची माहिती मिळाली आहे. सध्या या फोनची तयारी सुरु असून लवकरच हा सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल.  

कंपनीनं या नव्या स्मार्टफोनची किंवा सीरिजची कोणतीही अधिकृत माहीत दिली नाही. परंतु OnePlus Ace नावाचा स्मार्टफोन बेंचमार्किंगसाठी गिकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फोन सर्वप्रथम चीन पुढील तिमाहीत आणि त्यानंतर भारतासह जगभरात सादर केला जाईल.  

OnePlus Ace ची गीकबेंच लिस्टिंग 

Geekbench च्या डेटाबेसमध्ये OnePlus Ace स्मार्टफोन OnePlus PGKM10 या मॉडेल नंबरसह दिसला आहे. या लिस्टिंगनुसार, OnePlus Ace स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. स्मार्टफोनला 12GB RAM ची ताकद दिली जाऊ शकते. तसेच यात Android 12 OS ऑपरेटिंग सिस्टम मिळू शकते. OnePlus Ace ला सिंगल कोर टेस्टमध्ये 962 तर मल्टी कोर टेस्टमध्ये 3,819 पॉईंट मिळाले आहेत.  

OnePlus Ace स्मार्टफोनमधील बटर आणि चार्जींग स्पीडची माहिती मिळाली आहे. लिकेनुसार फोन 4,500mAh च्या बॅटरीसह बाजारात येईल आणि ही बॅटरी 150W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल. तर चीनच्या 3C सर्टिफिकेशन्स वेबसाईटवरील लिस्टिंगमध्ये 160W फास्ट चार्जिंगचा उल्लेख देखील आहे. खरा चार्जिंग स्पीड स्मार्टफोनच्या लाँचनंतरच समजेल.  

Web Title: OnePlus Ace Geekbench Listing Reveals Mediatek Dimensity 8100 Soc And 150w Charging 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.