OnePlus Band वर मिळतेय 1000 रुपयांची सूट; सिंगल चार्जवर चालतो 2 आठवडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 05:16 PM2021-12-03T17:16:35+5:302021-12-04T13:27:07+5:30
Oneplus Band Price In India: OnePlus Band आता 1000 रुपयांचा डिस्काउंटसह विकत घेता येतील. यातील 100mAh ची बॅटरी सिंगल चार्जमध्ये सुमारे 2 आठवड्यांचा बॅकअप देते.
OnePlus नं यावर्षीच्या सुरुवातीला OnePlus Band च्या माध्यमातून वियरेबल डिव्हाइसेस सादर करण्यास सुरुवात केली होती. हा बँड हार्ट रेट सेन्सर, SpO2 सेन्सर आणि IP68 रेटिंगसह सादर करण्यात आला होता. आता या वनप्लसच्या फिटनेस ट्रॅकरवर अॅमेझॉनकडून जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. OnePlus Band आता 1000 रुपयांचा डिस्काउंटसह विकत घेता येतील.
OnePlus Band ची किंमत
लाँचच्या वेळी OnePlus Band ची किंमत 2,499 रुपये ठेवण्यात आली होती. आता 1000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर हा फिटनेस बँड 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OnePlus Band कंपनीनं फक्त ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.
OnePlus Band चे फीचर्स
OnePlus Band फिटनेस बँडमध्ये 1.1-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एक टच डिस्प्ले आहे, ज्याची ब्राईटनेस नियंत्रित करता येते. या बँडमध्ये IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स देण्यात आला आहे. OnePlus Band मध्ये ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, 3-अॅक्सिस एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि SpO2 सेन्सर असे हेल्थ फीचर्स मिळतात.
हा बँड आउटडोर रनिंग, इनडोर रनिंग, फॅट बर्न रनिंग, आउटडोर वॉक, आउटडोर सायकलिंग, इनडोर सायकलिंग, इलिप्टिकल ट्रेनर, रोविंग मशीन, क्रिकेट, बॅडमिंटन, पूल स्वीमिंग, योगा आणि फ्री ट्रेनिंग असे 13 सपोर्ट्स मोड मिळतात. यातील 100mAh ची बॅटरी सिंगल चार्जमध्ये सुमारे 2 आठवड्यांचा बॅकअप देते.