एकदा चार्ज केल्यावर 38 तास चालतील OnePlus चे इयरबड्स; फक्त 10 मिनिटांत होणार चार्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:32 PM2021-12-17T12:32:43+5:302021-12-17T12:43:18+5:30

OnePlus नं OnePlus Buds Z2 लाँच केला आहे. यात ANC Features, Dolby Atoms, Bluetooth V5.1 असे फीचर्स मिळतात.  

Oneplus buds z2 launched with 38 hours of battery life anc dolby atoms features  | एकदा चार्ज केल्यावर 38 तास चालतील OnePlus चे इयरबड्स; फक्त 10 मिनिटांत होणार चार्ज  

एकदा चार्ज केल्यावर 38 तास चालतील OnePlus चे इयरबड्स; फक्त 10 मिनिटांत होणार चार्ज  

Next

OnePlus Buds Z2 इयरबड्स कंपनीनं जागतिक बाजारात सादर केले आहेत. भारतात हे OnePlus 9RT स्मार्टफोनसह सादर केले जातील, अशी बातमी आली आहे. हे ट्रूली वायरलेस (TWS) इयरबड्स आहेत. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि 11mm बेस-टर्न्ड ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. सध्या अमेरिकन आणि युरोपियन बाजारात आलेले हे बड्स लवकरच भारतात देखील येतील.  

OnePlus Buds Z2 ची किंमत 

OnePlus Buds Z2 ची अमेरिकेतील किंमत 99 डॉलर ठेवण्यात आली आहे. तर युरोपियन मार्केटमध्ये हे 99 यूरो मध्ये विकत घेता येतील. हे इयरबड्स Obsidian Black आणि Pearl White, अशा दोन रंगात उपलब्ध होतील. जुने OnePlus Buds Z भारतात परवडणाऱ्या किंमतीत आले होते. त्यामुळे हे देखील त्याच किंमतीती येतील अशी अपेक्षा आहे.  

OnePlus Buds Z2 चे स्पेसिफिकेशन्स  

OnePlus Buds Z2 च्या डिजाइनमध्ये जास्त बदल करण्यात आला नाही. या इयरबड्समध्ये 11mm बेस-टर्न्ड डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. यातील 3 माईक कॉलच्या वेळी नॉइज कॅन्सल करून चांगली साऊंड क्वॉलिटी देतात. तसेच यात Dolby Atoms आणि Bluetooth v5.1 सपोर्ट देखील देण्यात आला आहे. 

OnePlus Buds Z2 बॅटरी बॅकअप देखील जबराट आहे. हे ब्द्स चार्जिंग केससह 38 तासांची बॅटरी लाईफ देऊ शकतात. यातील फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीमुळे फक्त 10 मिनिटांच्या चार्जवर 5 तासांचा म्यूजिक प्लेबॅक टाइम मिळू शकतो. हे इयरबड्स 40dB Active Noise Cancellation सह बाजारात आले आहेत. तसेच यात ट्रांसपेरेसी मोड आणि 94ms अल्ट्रा लो लेटन्सी मिळते. 

हे देखील वाचा: 

फ्लिपकार्टचा जबरदस्त सेल सुरु; हे 8 मोबाईल फोन मिळतायत स्वस्तात....आयफोनही

12GB RAM सह वनप्लसचा स्वस्त 5G Phone घेणार एंट्री; 65W चार्जिंग स्पीडनं मिनिटांत चार्ज होईल फोन  

Web Title: Oneplus buds z2 launched with 38 hours of battery life anc dolby atoms features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.