38 तासांच्या बॅटरी बॅकअपसह लाँच होऊ शकतो OnePlus Buds Z2; स्पेसिफिकेशन झाले लीक  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 05:05 PM2021-10-02T17:05:01+5:302021-10-02T17:05:08+5:30

OnePlus Buds Z2 ब्लूटूथ 5.2 कनेक्टिविटी आणि IP55 सर्टिफिकेशनसह बाजारात दाखल होऊ शकतात. 

Oneplus buds z2 may come with 38 hour battery life specification leak online  | 38 तासांच्या बॅटरी बॅकअपसह लाँच होऊ शकतो OnePlus Buds Z2; स्पेसिफिकेशन झाले लीक  

38 तासांच्या बॅटरी बॅकअपसह लाँच होऊ शकतो OnePlus Buds Z2; स्पेसिफिकेशन झाले लीक  

Next

वनप्लस मोबाईलच्या आगामी इयरबड्सची माहिती लीक झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेंडर लीक झाल्यानंतर आता OnePlus Buds Z2 चे महत्वाचे स्पेक्स समोर आले आहेत. लीकनुसार कंपनी हे इयरबड्स 38 तासांच्या बॅटरी बॅकअपसह सादर करू शकते. आधीच्या लीकनुसार हे बड्स ऑक्टोबरमध्ये बाजारात दाखल होऊ शकतो. 

OnePlus Buds Z2 गेल्यावर्षी लाँच झालेल्या OnePlus Buds Z ची जागा घेतील. सध्या कंपनीचे OnePlus Buds Z आणि OnePlus Buds Pro हे दोन TWS इयरबड्स बाजारात उपलब्ध आहेत. Max Jambor ने एक ट्विटकरून Z2 चा फोटो शेयर केला आहे. टिप्सटरनुसार, वनप्लस बड्स झेड2 ब्लूटूथ 5.2 कनेक्टिविटीसह बाजारात येतील. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन मिळेल. वनप्लस बड्स झेड2 IP55 सर्टिफाइड असतील, म्हणजे धूळ आणि पाण्यापासून हे वाचतील. विशेष म्हणजे यात डॉल्बी अटॉमस सपोर्ट देखील मिळू शकतो. 

टिप्सटरने या इयरबड्सच्या बॅटरी बॅकअपची माहिती दिली आहे. हे वनप्लस बड्स चार्जिंग केससह 38 तासांचा म्युजिक टाइम देऊ शकतात. फक्त ईयरबड मात्र 7 तास वापरता येतील. 10 मिनिटांच्या चार्जिंगने हे इयरबड्स 5 तासांचा प्लेबॅक देऊ शकतील. वनप्लसचे आगामी बड्स झेड2 ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील.  

Web Title: Oneplus buds z2 may come with 38 hour battery life specification leak online 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.