10 मिनिटांच्या चार्जिंगवर 20 तास म्युजिक; परवडणाऱ्या किंमतीत नवीन वनप्लस इयरबड्स लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: April 1, 2022 12:55 PM2022-04-01T12:55:48+5:302022-04-01T12:56:07+5:30

OnePlus Bullets Wireless Z2 ची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स बीम ब्लू आणि मॅजिको ब्लॅक शेड्समध्ये विकत घेता येईल.

OnePlus Bullets Wireless Z2 Earbuds Launched In India Check Price  | 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 20 तास म्युजिक; परवडणाऱ्या किंमतीत नवीन वनप्लस इयरबड्स लाँच  

10 मिनिटांच्या चार्जिंगवर 20 तास म्युजिक; परवडणाऱ्या किंमतीत नवीन वनप्लस इयरबड्स लाँच  

googlenewsNext

OnePlus नं काल एका लाँच इव्हेंटचं आयोजन केलं होतं. या इव्हेंटमधून कंपनीनं आपला नवीन फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन वनप्लस 10 प्रो सादर केला आहे. परंतु हा एकच वनप्लस डिवाइस भारतीयांच्या भेटीला आला नाही. तर कंपनीनं भारतात OnePlus Bullets Wireless Z2 इयरबड्स देखील भारतात सादर केले आहेत. सोबत कंपनीनं याआधी आलेल्या वनप्लस बड्स प्रोचा रेडिएंट सिल्वर कलर ऑप्शन देखील सादर केला आहे.  

OnePlus Bullets Wireless Z2 ची किंमत 

OnePlus Bullets Wireless Z2 ची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स बीम ब्लू आणि मॅजिको ब्लॅक शेड्समध्ये विकत घेता येईल. यांची विक्री येत्या 5 एप्रिलपासून केली जाईल. सोबत OnePlus Buds Pro Radiant Silver कलर व्हेरिएंट देखील 9,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील.  

OnePlus Bullets Wireless Z2 चे स्पेसिफिकेशन्स 

OnePlus Bullets Wireless Z2 इयरबड्समध्ये 12.4mm च्या मोठ्या ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. यात AI सीन-मॉडेल अ‍ॅल्गोरिथ्म देण्यात आला आहे, जो इनबिल्ट मायक्रोफोनच्या मदतीनं कॉल नॉइज रिडक्शन लेव्हल अ‍ॅजडस्ट करतो. यातील IP55 रेटिंग धूळ आणि पाण्यापासून इयरबड्सचं संरक्षण करते. सिलिकॉन बॉडीपासून बनलेले इयरबड्सवर हाइड्रोफोबिक नॅनो-कोटिंग देण्यात आली आहे.  

सीरिजमधील अन्य इयरबड्समधील सिग्नेचर मॅग्नेटिक बड्स देण्यात आले आहेत, जे वेगळे केले की इयरबड्स डिवाइसशी कनेक्ट होतात. यात ब्लूटूथ v5 कनेक्टिविटी देण्यात आली आहे. यात AAC आणि SBC कोडॅक्स सपोर्ट मिळतात. यातील 200mAh ची बॅटरी 30 तासांचा प्लेबॅक टाइम देऊ शकते. तसेच यातील फास्ट चार्जिंग फिचर 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 20 तासांचा बॅकअप देऊ शकतं.  

 

Web Title: OnePlus Bullets Wireless Z2 Earbuds Launched In India Check Price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.