खुशखबर! 20 हजारांच्या आत येणार OnePlus चा स्मार्टफोन; वाढवणार रेडमी-रियलमीची चिंता
By सिद्धेश जाधव | Published: February 25, 2022 12:39 PM2022-02-25T12:39:48+5:302022-02-25T12:41:32+5:30
OnePlus Nord CE 2 Lite: OnePlus Nord CE 2 Lite स्मार्टफोन वीस हजारांच्या आत सादर केला जाऊ शकतो. या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईन लाँचपूर्वीच लीक झाली आहे.
OnePlus Nord CE 2 स्मार्टफोन गेल्याच आठवड्यात भारतात आला आहे. कंपनीनं हा फोन 25 हजार रुपयांच्या आसपास सादर केला आहे. आता वनप्लस यापेक्षाही स्वस्त स्मार्टफोनवर काम करत असल्याची बातमी आली आहे. हा फोन OnePlus Nord CE 2 Lite नावानं बाजारात येईल. नावावरून हा अलीकडेच आलेल्या वनप्लसचा किफायतशीर व्हर्जन वाटत आहे. एक नवीन रिपोर्टमधून वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईटच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.
OnePlus Nord CE 2 Lite ची डिजाईन
Pricebaba च्या रिपोर्टनुसार, OnePlus Nord CE 2 Lite स्मार्टफोनचे रेंडर्स टिपस्टर योगेश ब्रारनं शेयर केले आहेत. त्यानुसार या फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात येईल. ज्यात एका एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरा सेन्सर असतील. फोनच्या डावीकडे पावर बटन मिळेल. यात वनप्लसचा सिग्नेचर अलर्ट स्लायडर मिळणार नाही.
OnePlus Nord CE 2 Lite चे संभाव्य स्पेसिफिकेशन
वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट 6.59-इंचाच्या फुल एचडी+ एलसीडी 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह सादर केला जाईल. यात ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटचा वापर केला जाईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल. यात अँड्रॉइड आधारित ऑक्सिजन ओएस मिळू शकतो.
फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64MP प्रायमरी सेन्सर, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा मोनो सेन्सर असेल. डिवाइसच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर असेल. हँडसेट मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल, जी 33W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.
हे देखील वाचा:
- 60MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह Motorola Edge 30 Pro भारतात लाँच; पहिल्याच सेलमध्ये 5000 रुपये ऑफ
- रिचार्जच्या किंमतीत Smartphone; इतक्या स्वस्तात मिळतोय 6GB RAM असलेला Tecno Spark 8C
- ‘या’ शानदार Smartwatch वर गेम देखील खेळता येणार; किंमत 3 हजारांपेक्षा कमी