भन्नाट फीचर्ससह OnePlus Band लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या काय आहे खास?
By जयदीप दाभोळकर | Published: January 5, 2021 12:42 PM2021-01-05T12:42:32+5:302021-01-05T12:46:55+5:30
या बँडमध्ये अॅमोलेड डिस्प्लेसह अनेक नवे आणि अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
वनप्लसचा पहिला वेअरेबल बँड OnePlus Band हा २०२१ च्या पहिल्या तिमाहीत भारतात लाँच केला जाणार असल्याची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली होती. आता OnePlus Band शी निगडित माहिती कंपनीनं शेअर करण्यास सुरूवात केली आहे. याव्यतिरिक्त एका परिचित टिप्स्टरनं त्या बँडची किंमत किती असेल आणि त्यात कोणते फीचर्स असतील हेदेखील सांगितलं आहे.
टिप्स्टर इशान अग्रवालनं OnePlus Band शी निगडीत माहिती शेअर केली आहे. त्यानं दिलेल्या माहितीनुसार OnePlus चा पहिला फिटनेस ट्रॅकर देशात ११ जानेवारीला लाँच केला जाणार आहे. याची किंमत २ हजार ४९९ रूपये इतकी असेल. तसंच समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये १.१ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या बँडमध्ये हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटरिंगसाठई एक SpO2 आणि स्लीप मॉनिटरिंग सपोर्ट मिळणार आहे.
Exclusive: OnePlus Band Launching on January 11 in India
— Ishan Agarwal (@ishanagarwal24) January 4, 2021
-24/7 Heart Rate + SpO2 Blood Saturation Monitoring
-Sleep Tracking
-1.1" Touch AMOLED Display
-14 Days Battery
-IP68
-13 Exercise Modes
-Around INR ₹2,499
What do you think? #OnePlus#OnePlusBand#SmartEverywearpic.twitter.com/tCLLwCrrTV
याव्यतिरिक्त OnePlus Band मध्ये १३ स्पोर्ट्स मोडदेखील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसंच हा बँज वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंससाठी IP68 सर्टिफिकेशन सहित येईल. फिटनेस ट्रॅकरची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर १४ दिवसांपर्यंत टिकणार असल्याचाही दावा करण्यात येत आहे.
'या' बँड्सची टक्कर
Oppo चा बँडही याच स्पेसिफिकेशनसहित येतो. याबद्दल गेल्या आठवड्यात लीक पोस्टरद्वारे माहिती समोर आली होती. OnePlus Band ला बँडला बाजारात उपलब्ध असलेल्या Mi Smart Band 5 आणि Mi Smart Band 4 ची टक्कर मिळणार आहे. OnePlus Band मध्ये येणारा SpO2 सेन्सर ही या बँडची खासियत असणार आहे. शाओमीच्या फिटनेस ट्रॅकरमध्ये हे फीचर्स देण्यात आलेले नाहीत.