OnePlus ने भारतात लॉन्च केला नवा Android TV; ऑफरमध्ये मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 03:08 PM2022-12-10T15:08:38+5:302022-12-10T15:09:29+5:30

OnePlus कंपनीनं भारतात नवा Android Smart TV लॉन्च केला आहे. वनप्लसच्या या टेलिव्हिजनचा साइज ५५ इंच इतकी आहे.

oneplus launched a new 55 inch 4k android tv in india | OnePlus ने भारतात लॉन्च केला नवा Android TV; ऑफरमध्ये मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

OnePlus ने भारतात लॉन्च केला नवा Android TV; ऑफरमध्ये मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

googlenewsNext

नवी दिल्ली-

OnePlus कंपनीनं भारतात नवा Android Smart TV लॉन्च केला आहे. वनप्लसच्या या टेलिव्हिजनचा साइज ५५ इंच इतकी आहे. यात 4k UHD डिस्प्ले देण्यात आला आहे. तर फूल-रेंज स्पीकर्स आणि OxygenPlay 2.0 सह टीव्ही उपलब्ध आहे. यात अनेक स्मार्ट फिचर्स देखील देण्यात आले आहेत. 

वनप्लसच्या नव्या स्मार्टटीव्हचं नाव OnePlus TV 55 Y1S Pro असं देण्यात आलं आहे. टीव्ही क्साली बेजल लेस डिझाइनसह उपलब्ध आहे. हा टेलिव्हिजन कंपनीच्या वेबसाइटसोबतच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वनप्लस एक्सपीरिअन्स स्टोअर्स तसंच सर्व प्रमुख ऑफलाइन पार्टनर स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 

OnePlus TV 55 Y1S Pro ची किंमत आणि उपलब्धता
OnePlus TV 55 Y1S Pro ची भारतातील किंमत ३९,९९९ रुपये इतकी असणार आहे. याचा सेल १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. लॉन्च ऑफर म्हणून कंपनी बँक डिस्काऊंट देखील देत आहे. 

आयसीआयसीआय बँक कार्डसह ग्राहक ३ हजार रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काऊंट प्राप्त करू शकतात. पण ही ऑफर फक्त २५ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. याशिवाय कंपनी ९ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI च्या पर्यायासह सर्व प्रमुख बँक ट्रान्झाक्शनवर देत आहे. 

स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
OnePlus TV 55 Y1S Pro मध्ये 4K UHD डिस्प्ले १०-बिट कलर डेप्थ देण्यात आलं आहे. यात HDR10+, HDR10 आणि HLG चा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या उत्कृष्ट व्ह्यइंग अनुभव मिळणार आहे. 

वन प्लस टीव्ही ५५ मध्ये Android TV 10.0 बेस्ड OxygenPlay 2.0 देण्यात आलं आहे. यात अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. Kids Mode चाही पर्याय यात उपलब्ध आहे. यात यूझर्स आपल्या मुलांचं टेलिव्हिजन पाहणं कंट्रोल करू शकतात. यात OxygenPlay 2.0 सह २३० हून अधिक लाइव्ह चॅनल्स देखील उपलब्ध होतात. 

Web Title: oneplus launched a new 55 inch 4k android tv in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.