स्वस्तात मस्त Smart TV! OnePlus नं केली रेडमीला मात देण्याची पुरेपूर तयारी; दमदार फीचर्ससह दोन मॉडेल लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 02:46 PM2022-02-18T14:46:45+5:302022-02-18T14:47:01+5:30
वनप्लसनं OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge असे दोन स्मार्ट टीव्ही मॉडेल सादर केले आहेत. हे दोन्ही नवीन स्मार्ट टीव्ही 32-इंच आणि 43-इंचाच्या दोन साईजमध्ये उपलब्ध होतील.
OnePlus न गुरुवारी एका इव्हेंटच्या माध्यमातून आपला सर्वात स्वस्त 5G फोन लाँच केला आहे. सोबत कंपनीनं OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge असे दोन स्मार्ट टीव्ही मॉडेल सादर केले आहेत. हे दोन्ही नवीन स्मार्ट टीव्ही 32-इंच आणि 43-इंचाच्या दोन साईजमध्ये उपलब्ध होतील. यात Android TV 11 ओएस आणि Dolby Audio सपोर्ट मिळतो.
स्पेसिफिकेशन्स
OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge मध्ये Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. Y1S मॉडेलमध्ये एचडी रिजोल्यूशन आहे, तर Y1S Edge मध्ये फुल-एचडी रिजॉल्यूशन देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्ट टीव्ही HDR10, HDR10+, HLG फॉर्मेटला सपोर्ट मिळतो, तसेच TUV रीनलँड सर्टिफिकेशन देखील देण्यात आलं आहे. तुम्ही हे टीव्ही गुगल असिस्टंटच्या मदतीनं फक्त आवाजाने कंट्रोल करतो करू शकता.
स्मार्ट टीव्ही मध्ये डॉल्बी ऑडियोला सपोर्ट मिळतो. Y1S मॉडेलमध्ये 20W फुल-रेंज स्टीरियो स्पिकर आहेत, तर Y1S Edge मॉडेलमध्ये 24W फुल-रेंज स्टीरियो स्पिकर मिळतात. यातील ऑक्सीजनप्ले 2.0 मुळे 230 पेक्षा जास्त लाईव्ह चॅनेल दिसतात. गेमर्ससाठी यात खास गेम मोड देण्यात आला आहे. तसेच 5GHz बँड सपोर्टसह ड्युअल-बँड वाय-फाय मिळतो.
किंमत
- OnePlus TV Y1S 32 इंच मॉडेल: 16,499 रुपये
- OnePlus TV Y1S 43-इंच मॉडेल: 26,999 रुपये
- OnePlus TV Y1S Edge 32-इंच मॉडेल: 16,999 रुपये
- OnePlus TV Y1S Edge 43-इंच मॉडेल: 27,999 रुपये
Y1S मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून विकत घेता येईल. तर Y1S Edge मॉडेल फक्त अधिकृत वनप्लस स्टोर आणि प्रमुख रिटेलर्सच्या माध्यमातून ऑफलाईन विकत घेता येईल 21 फेब्रुवारीपासून या स्मार्ट टीव्हीची विक्री सुरु होईल.
हे देखील वाचा:
- 1200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवा कोरा 5G Smartphone; फक्त 1 रुपयांमध्ये मिळणार इयरबड्स
- सर्वात स्वस्त 5G Smartphone! 8GB रॅमसह OnePlus Nord CE 2 5G ची भारतात एंट्री