OnePlus Nord 2 लाँचचा मुहूर्त ठरला; Dimensity 1200 चिपसेटसह या दिवशी येऊ शकतो भारतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 12:48 PM2021-07-08T12:48:57+5:302021-07-08T12:49:36+5:30
OnePlus Nord 2 5G Launch date: OnePlus Nord 2 स्मार्टफोन 24 जुलै किंवा त्यानंतर काही दिवसांत भारतात लाँच केला जाईल.
OnePlus मिड रेंज सेगमेंटमध्ये प्रवेश केल्यापासून कंपनीच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी कंपनी लवकरच नवीन फ्लॅगशिप कीलर OnePlus Nord 2 5G भारतात लाँच करणार आहे. वनप्लस इंडियाने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपला नवीन मोबाईल फोन वनप्लस नॉर्ड 2 लाँच करणार आहे. OnePlus Nord 2 5G फोन भारतीय बाजारात MediaTek Dimensity 1200 चिपसेटसह लाँच होऊ शकतो. (Oneplus Nord 2 5G launch confirmed to be first OnePlus smartphone to come with Mediatek processor)
कंपनीने थेट OnePlus Nord 2 5G च्या लाँच डेटचा उल्लेख केला नाही, परंतु वनप्लस इंडियाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर टीजर व्हिडीओ शेयर करून ‘कमिंग सून’ असे लिहिले आहे. तसेच कंपनीने फोन लाँचपूर्वी वनप्लस नॉर्ड 2 मध्ये MediaTek Dimensity 1200 चिपसेट असल्याची माहिती दिली आहे. लीक रिपोर्टनुसार OnePlus Nord 2 स्मार्टफोन 24 जुलै किंवा त्यानंतर काही दिवसांत भारतात लाँच केला जाईल.
Coming soon. pic.twitter.com/lNAvUlNoy8
— OnePlus India (@OnePlus_IN) July 7, 2021
OnePlus Nord 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
याआधी आलेल्या वनप्लस नॉर्ड 2 संबंधित लिक्सनुसार, Nord 2 मध्ये Dimensity 1200 चिपसेट आणि 12GB पर्यंत रॅम मिळेल. या फोन मध्ये 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले असेल, हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो. वनप्लसच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर आणि 8GB RAM असेल.
OnePlus Nord 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यात मेन कॅमेरा 50MP चा असू शकतो. सोबत 8MP आणि 2MP चा अजून दोन सेन्सर असतील. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. OnePlus Nord 2 मध्ये 4500mAh ची बॅटरी असू शकते, ही बॅटरी 30W किंवा 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वनप्लस नॉर्ड 2 ची किंमत 22500 रुपये असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे.