OnePlus Nord 2 मध्ये स्फोट झाल्यानंतर कंपनीची मोठी घोषणा, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 09:56 AM2021-11-12T09:56:22+5:302021-11-12T10:28:24+5:30

OnePlus Nord 2 5G : काही दिवसांपूर्वी स्मार्टफोनमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

oneplus nord 2 5g user who suffered severe burns due to explosion gets phone refund and medical expenses | OnePlus Nord 2 मध्ये स्फोट झाल्यानंतर कंपनीची मोठी घोषणा, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

OnePlus Nord 2 मध्ये स्फोट झाल्यानंतर कंपनीची मोठी घोषणा, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

googlenewsNext

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी OnePlus Nord 2 5G स्मार्टफोनमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या अचानक झालेल्या स्फोटामुळे एक युजर गंभीर जखमी झाला होता. गेल्या आठवड्यात एका युजरने या दुर्घटनेची माहिती दिली होती. त्याला आता कंपनीकडून दुजोरा देण्यात आला आहे. OnePlus Nord 2 मध्ये स्फोट झाल्यानंतर कंपनीने मोठी घोषणा असून तातडीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एका नव्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, वनप्लस कंपनीने रिफंड जारी केला आहे. तसेच पीडित व्यक्तीचा मेडिकल खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. 

OnePlus Nord 2 5G मध्ये स्फोट होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी देखील अशा काही घटना घडल्या आहेत. मात्र सध्या झालेल्या स्फोटामध्ये युजर गंभीररित्या जखमी झाला आहे. त्यामुळेच आता वन प्लस नॉर्ड 2 च्या सुरक्षिततेबाबत युजर्सच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीकडून माहिती घेत MySmartPrice चा एक रिपोर्ट समोर आला आहे. वनप्लसने विस्फोटसाठी रिफंड जारी केला आहे. युजर्सच्या उपचाराचा खर्च करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे ऑपरेशनल हेड सुद्धा मदतीसाठी पीडित व्यक्तीच्या संपर्कात आहेत. वनप्लसने अजूनपर्यंत कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिला नाही. ट्विटरवर या घटनेची माहिती देणाऱ्या युजर्सने सुद्धा नुकसान भरपाई संबंधी कोणतेही अपडेट अद्याप दिलेले नाहीत. मात्र त्याआधी त्या व्यक्तीने कंपनी सतत त्याच्या संपर्कात आहे असं म्हटलं होतं. OnePlus Nord 2 5G ला भारत आणि ग्लोबल मार्केटमध्ये जुलैमध्ये लाँच केले होते. लाँच केल्यानंतर काही आठवड्यानंतर एका युजरने आरोप केला होता की, फोन खरेदी केल्यानंतर काही दिवसांनंतर स्फोट झाला होता. 

अन्य एका OnePlus Nord 2 5G युजरने आरोप केला होता की फोनचा स्फोट झाला होता. त्यानंतर कंपनीने थेट युजरलाच नोटीस पाठवली आहे. दिल्लीतील एका वकिलाने ट्विट करत आपल्या फोनला अचानक आग लागल्याचा दावा केला होता. यानंतर आता OnePlus Nord 2 स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट आला. कंपनीने थेट युजरलाच नोटीस पाठवली. कंपनीने युजरने केलेला हा दावा अपमानास्पद असल्याचं म्हटलं आहे व सीज आणि डिसिस्ट नोटीस पाठवली होती. 10 सप्टेंबरला दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी आरोप केला होता की, वनप्लस नॉर्ड 2 मध्ये जवळपास 90 टक्के बॅटरी होती व फोन चार्जिंगला देखील लावलेला नव्हता. काहीही न करता अचानक फोनला आग लागली.
 

Read in English

Web Title: oneplus nord 2 5g user who suffered severe burns due to explosion gets phone refund and medical expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.