OnePlus Nord 2 स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, कंपनीने थेट युजरलाच पाठवली नोटीस; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:50 PM2021-09-21T12:50:47+5:302021-09-21T12:58:55+5:30

Oneplus nord 2 blast update company sends cease and desist notice to lawyer : दिल्लीतील एका वकिलाने ट्विट करत आपल्या फोनला अचानक आग लागल्याचा दावा केला होता. यानंतर आता OnePlus Nord 2 स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

oneplus nord 2 blast update company sends cease and desist notice to lawyer alleging it is smear campaign | OnePlus Nord 2 स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, कंपनीने थेट युजरलाच पाठवली नोटीस; 'हे' आहे कारण

OnePlus Nord 2 स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, कंपनीने थेट युजरलाच पाठवली नोटीस; 'हे' आहे कारण

googlenewsNext

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी OnePlus Nord 2 स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दिल्लीतील एका वकिलाने ट्विट करत आपल्या फोनला अचानक आग लागल्याचा दावा केला होता. यानंतर आता OnePlus Nord 2 स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. कंपनीने थेट युजरलाच नोटीस पाठवली आहे. कंपनीने युजरने केलेला हा दावा अपमानास्पद असल्याचं म्हटलं आहे व सीज आणि डिसिस्ट नोटीस पाठवली आहे. 10 सप्टेंबरला दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी आरोप केला होता की, वनप्लस नॉर्ड 2मध्ये जवळपास 90 टक्के बॅटरी होती व फोन चार्जिंगला देखील लावलेला नव्हता. काहीही न करता अचानक फोनला आग लागली.

कंपनीने यानंतर व्यक्तीशी संपर्क करत टेस्टसाठी डिव्हाईस जमा करण्यास सांगितले होते. मात्र गुलाटी यांनी कायदेशीर मार्गाने जाणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच, अधिकृत तक्रार दाखल केल्यानंतर डिव्हाईसला पोलिसांकडे सोपवलं जाईल असंही सांगितलं होतं. OnePlus India ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने गुलाटी यांना सीज आणि डिसिस्ट नोटीस पाठवली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, आम्ही पुष्टी करतो की संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रकरण सोडवण्यासाठी योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जाईल. सीज आणि डिसिस्ट लेटरमध्ये वनप्लसने दावा केला आहे की, गुलाटी यांनी नुकसान झाल्याचा पुरावा देण्यास नकार दिला आहे.

"वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट"; खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी

ट्विटरवर त्यांनी शेअर केलेल्या फोटोमधून लक्षात येते की बॅटरी पोलवर काही एक्सटर्नल फोर्स लावण्यात आले आहे. गुलाटी यांनी कंपनीद्वारे दिलेली मदत नाकारली व कंपनीने मागितलेला पुरावा दिलेला नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, जो दावा करण्यात आला आहे कोणतीही पुष्टी न करता केला गेला. या पत्रात गुलाटी यांना आपली विधाने पोस्ट करणे बंद करण्यास सांगितलं आहे. तसेच,आधीचे ट्विट डिलीट करण्यास व पोस्टसाठी कोणत्याही अटीशिवाय माफी मागण्यास सांगितलं आहे. जे पत्र कंपनीकडून पाठविण्यात आले होते त्यात म्हटले की, गुलाटी यांचा दावा वेबसाइट्सने प्रकाशित केला होता. 

वनप्लस स्फोट प्रकरणाला वेगळं वळण, कंपनीने उचललं मोठं पाऊल

युजरला मीडिया पब्लिकेशनशी संपर्क करणे व स्पष्टीकरण देण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. याआधी कंपनीने म्हटले होते की, एका व्यक्तीने ट्विटरवर OnePlus Nord 2 च्या कथित स्फोटाबाबत माहिती दिली. आमची टीम या दाव्यातील सत्यता तपासण्यासाठी त्वरित त्या व्यक्तीकडे गेले. आम्ही यूजर्सच्या सुरक्षेसाठी अशाप्रकारचे दावे गंभीरतेने घेतो. या डिव्हाइसच्या पडताळणीसाठी, ज्यात भेट देखील देण्यात आली. मात्र, अनेकदा प्रयत्न केल्यानंतर देखील व्यक्तीने तपासणी करू दिली नाही. अशा स्थितीमध्ये हा दावा पडताळणे व नुकसान भरपाई देणे शक्य नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Read in English

Web Title: oneplus nord 2 blast update company sends cease and desist notice to lawyer alleging it is smear campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.