12GB RAM सह वनप्लसचा स्वस्त 5G Phone घेणार एंट्री; 65W चार्जिंग स्पीडनं मिनिटांत चार्ज होईल फोन
By सिद्धेश जाधव | Published: December 16, 2021 04:39 PM2021-12-16T16:39:02+5:302021-12-16T16:39:53+5:30
OnePlus Nord 2 CE 5G Phone: OnePlus Nord 2 CE भारतात पुढील वर्षी सादर केला जाईल. पुढील वर्षी येणारा हा कंपनीचा देशातील पहिला फोन असू शकतो.
OnePlus सध्या एका स्वस्त 5G Phone वर काम करत आहे. हा फोन ‘नॉर्ड सीरीज’ अंतर्गत OnePlus Nord 2 CE नावानं लाँच केला जाईल. आता 91मोबाईल्सलनं या फोनची लाँच टाईमलाईनची माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा फोन OnePlus 9RT च्या आधीच भारतात सादर केला जाईल.
आगामी वनप्लस नॉर्ड 2 सीई स्मार्टफोन 2022 मध्ये भारतात येणारा कंपनीचा पहिला फोन असू शकतो. हा फोन पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च दरम्यान सादर केला जाईल. या फोनच्या लाँचची अचूक तारीख मात्र समोर आली नाही. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि फ्लॅगशिप वनप्लस 9आरटी च्या भारतीय लाँचसाठी वाट बघावी लागू शकते.
OnePlus Nord 2 CE चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord 2 CE मध्ये 6.4 इंचाच मोठा अॅमोलेड डिस्प्ले मिळेल. हा पंच-होल डिजाईनसह येणारा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह सादर केला जाईल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सिजन ओएसवर चालेल. यात मीडियाटेक डिमेनसिटी 900 5G चिपसेटची ताकद मिळू शकते. त्याचबरोबर 12 जीबी पर्यंतचा रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड 2 सीई मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते. हा फोन 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येईल. यातील 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. भारतात OnePlus Nord 2 CE ची किंमत 28,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
हे देखील वाचा:
फ्लिपकार्टचा जबरदस्त सेल सुरु; हे 8 मोबाईल फोन मिळतायत स्वस्तात....आयफोनही
भारीच! आली जगातील पहिली 100W चार्जिंग स्पीड आलेली पॉवरबँक; मिनिटांत फुल चार्ज होईल फोन