OnePlus Nord 2 चे स्पेसिफिकेशन्स लीक; 8GB रॅमसह मिळू शकतो MediaTek Dimensity 1200 चिपसेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 03:02 PM2021-06-28T15:02:27+5:302021-06-28T15:03:07+5:30

OnePlus Nord 2 Specifications Tipped: OnePlus Nord 2 ला AI बेंचमार्क प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. इथून या फोनसी निगडित खूप माहिती समोर आली आहे.  

Oneplus nord 2 spotted on ai benchmark with mediatek dimensity 1200 8gb ram  | OnePlus Nord 2 चे स्पेसिफिकेशन्स लीक; 8GB रॅमसह मिळू शकतो MediaTek Dimensity 1200 चिपसेट 

OnePlus Nord 2 चे स्पेसिफिकेशन्स लीक; 8GB रॅमसह मिळू शकतो MediaTek Dimensity 1200 चिपसेट 

googlenewsNext

OnePlus Nord 2 लवकरच लाँच होणार आहे, लाँचपूर्वी या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. हा स्मार्टफोन AI बेंचमार्क प्लॅटफॉर्मवर लिस्ट करण्यात आला आहे, या लिस्टिंगच्या माध्यमातून चिपसेट आणि रॅमसह इतर माहिती समजली आहे. वनप्लसचा हा लवकरच बाजारात दाखल होईल, असा अंदाज AI बेंचमार्क प्लॅटफॉर्मवरील लिस्टिंगवरून वर्तवला जात आहे.  

वनप्लस नॉर्ड 2 ची ही लिस्टिंग प्रसिद्ध टिप्सटर मुकुल शर्माने सर्वप्रथम बघितली आहे. शर्माने दिलेल्या माहितीनुसार, वनप्लसच्या या फोनमध्ये  MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर आणि 8GB RAM असेल. 

OnePlus Nord 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

याआधी आलेल्या वनप्लस नॉर्ड 2 संबंधित लिक्सनुसार, Nord 2 मध्ये Dimensity 1200 चिपसेट आणि 12GB पर्यंत रॅम मिळेल. या फोन मध्ये 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले असेल, हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो.  

OnePlus Nord 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यात मेन कॅमेरा 50MP चा असू शकतो. सोबत 8MP आणि 2MP चा अजून दोन सेन्सर असतील. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. OnePlus Nord 2 मध्ये 4500mAh ची बॅटरी असू शकते, ही बॅटरी 30W किंवा 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वनप्लस नॉर्ड 2 ची किंमत 22500 रुपये असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. 

Web Title: Oneplus nord 2 spotted on ai benchmark with mediatek dimensity 1200 8gb ram 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.