बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला दमदार OnePlus Nord 2T 5G; कमी किंमतीत 80W फास्ट चार्जिंग
By सिद्धेश जाधव | Published: May 20, 2022 01:05 PM2022-05-20T13:05:46+5:302022-05-20T13:06:04+5:30
OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर, 50MP चा कॅमेरा, 32MP चा सेल्फी कॅमेरा आणि 4,500mAh ची बॅटरी मिळते.
OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन जगातील पहिला असा डिवाइस आहे, ज्यात MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 50MP चा कॅमेरा, 32MP चा सेल्फी कॅमेरा आणि 4,500mAh ची बॅटरी मिळते. सध्या युरोपात या हँडसेटनं एंट्री घेतली आहे. लवकरच भारतात देखील हा फोन येऊ शकतो. हा हँडसेट OnePlus Nord 2 5G स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन आहे.
OnePlus Nord 2T 5G चे स्पेसिफिकेशन्स
फोटोग्राफीसाठी OnePlus Nord 2T 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा Sony IMX766 सेन्सर OIS सह मुख्य कॅमेऱ्याचं काम करतो. सोबत 8MP चा Sony IMX35 अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP तिसरा मोनोक्रोम सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
यात 6.43 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. OnePlus Nord 2T 5G फोन Android 12 बेस्ड OxygenOS 12.1 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आहे, सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. OnePlus Nord 2T 5G मध्ये 4,500mAh ची बॅटरी 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह मिळते.
OnePlus Nord 2T 5G ची किंमत
युरोपमध्ये OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 369 यूरो (जवळपास 30,265 रुपये) ठेवण्यात आली आहे, जो 8GB RAM व 128GB स्टोरेजसह येतो. तर 12GB RAM व 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 469 यूरो (जवळपास 38,456 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन Gray Shadow आणि Jade Fog कलर्समध्ये विकत घेता येईल.