अजून एक धमाका करण्यासाठी येतोय OnePlus चा किफायतशीर फोन, असे असतील स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Published: May 3, 2022 07:51 PM2022-05-03T19:51:43+5:302022-05-03T19:52:13+5:30

OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे, त्यामुळे लवकरच हा डिवाइस सादर केला जाईल हे स्पष्ट झालं आहे.  

Oneplus Nord 2T 5G May Launch With Mediatek Dimensity 1300 Soc Soon  | अजून एक धमाका करण्यासाठी येतोय OnePlus चा किफायतशीर फोन, असे असतील स्पेसिफिकेशन्स 

अजून एक धमाका करण्यासाठी येतोय OnePlus चा किफायतशीर फोन, असे असतील स्पेसिफिकेशन्स 

googlenewsNext

OnePlus यंदा थांबण्याचं नावच काढत नाही आहे. कंपनीनं आतापर्यंत भारतात चार डिवाइस सादर केले आहेत, ज्यात OnePlus Nord CE 2, OnePlus Nord CE 2 Lite, OnePlus 10 Pro आणि OnePlus 10R चा समावेश आहे. तर आता OnePlus Nord 2T 5G लवकरच लाँच होणार असलायची बातमी आली आहे. नॉर्ड सीरिजमध्ये येत असल्यामुळे हा एक किफायतशीर हँडसेट असू शकतो.  

MySmartPrice नं टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने OnePlus Nord 2T 5G ची माहिती दिली आहे. हा आगामी वनप्लस डिवाइस NBTC या सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. इथे या फोनचा मॉडेल नंबर CPH2399 असल्याचं समजलं आहे. गेले कित्येक दिवस या हँडसेटची चर्चा सुरु आहे परंतु हा डिवाइस कधी येईल, तसेच यात कोणते स्पेक्स असतील याची जास्त माहिती मिळाली नाही.  

OnePlus Nord 2T 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

OnePlus Nord 2T 5G मध्ये 6.43-इंचाचा फुलएचडी+ फ्लुइड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. हा पंच होल डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या डिमेन्सिटी 1300 SoC सह बाजारात येऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सिजन ओएसवर चालेल. मागे असलेल्या ट्रिपल-कॅमेरा सेटअपमध्ये 50MP मुख्य सेन्सर मिळू शकतो, सोबत 8MP चा अल्ट्रा-वाईड-अँगल सेन्सर आणि 2MP थर्ड सेन्सर मिळेल. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. डिवाइसमध्ये 80W फास्ट-चार्जिंगसह 4500mAh ची बॅटरी मिळू शकते.  

Web Title: Oneplus Nord 2T 5G May Launch With Mediatek Dimensity 1300 Soc Soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.