सर्वांच्या बजेटमध्ये बसणार 15 मिनिटांत फुलचार्ज होणारा फोन; OnePlus Nord 3 करू शकतो विक्रम
By सिद्धेश जाधव | Published: March 3, 2022 05:46 PM2022-03-03T17:46:29+5:302022-03-03T17:47:37+5:30
OnePlus Nord 3 स्मार्टफोन ओप्पोच्या 150W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येऊ शकतो.
OnePlus यावर्षी आपली ओळख बदल्याण्याची तयारी करत आहे. निवडक स्मार्टफोन सादर करणारी कंपनी यावर्षी अनेक स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीचा फ्लॅगशिप OnePlus 10 Pro मार्चमध्ये भारतासह जागतिक बाजारात येणार आहे. तर 2022 च्या उत्तरार्धात मिड-रेंज OnePlus Nord 3 देखील सादर केला जाऊ शकतो, अशी माहिती आली आहे.
वेगवान चार्जिंगसह येणार OnePlus Nord 3
OnePlus Nord सीरीजचा आगामी स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येईल, असा दावा Android Central च्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. कंपनीच्या सीईओनी देखील याआधी वनप्लस Oppo च्या 150W SuperVOOC टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन स्मार्टफोन्स सादर करेल, असे सांगितलं होतं. या टेक्नॉलॉजीसह यंदाच्या दुसऱ्या सहामाहीत येणारा हा फोन OnePlus Nord 3 असू शकतो.
तसेच कंपनी 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत आणखीन दोन मॉडेल्स सादर करेल. हे फ्लॅगशिप लेव्हल OnePlus 10 आणि OnePlus 10R स्मार्टफोन असतील. रिपोर्टनुसार, OnePlus 10R फोन MediaTek Dimensity 9000 चिपसेटसह येईल. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
हे देखील वाचा:
- फोन हँग होण्याचं झंझट नाही! दमदार 19GB RAM सह आला Realme V25 5G, सोबत 5,000mAh ची मोठी बॅटरी
- डील ऑफ द डे! 3 हजार रुपयांमध्ये मिळवा OPPO चा 5G Smartphone, फक्त आजचा दिवस धमाल ऑफर
- ‘या’ स्मार्टवॉचमुळे भाजत आहेत युजर्सचे हात; लोकप्रिय कंपनीनं परत मागवले 10 लाख युनिट्स, हे आहे कारण