जबरदस्त! OnePlus Nord 4 5Gची आजपासून विक्री, मिळणार मोठी सूट; Amazon वर खास ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 06:27 PM2024-08-02T18:27:27+5:302024-08-02T18:29:13+5:30
OnePlus Nord 4 Price in India: OnePlus च्या नवीनतम फोनची विक्री आजपासून सुरू होत आहे. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
OnePlus Nord 4 ची विक्री आज म्हणजेच २ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन तुम्ही Amazon आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. कंपनीने गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन OnePlus Pad 2 सह लॉन्च केला होता. त्यांच्या हँडसेटमध्ये काही खास फिचर्स आहेत.
या फोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
कंपनीने फोनमध्ये मेटल डिझाइन दिले आहे. सध्या असे डिझाइन बहुतेक फोनमध्ये दिसत नाही, पण यात ते प्रामुख्याने देण्यात आले आहे. यात AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. तसेच यात १२ GB पर्यंत रॅम आहे. याची किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घ्या.
OnePlus Nord 4 5G ची किंमत
हा स्मार्टफोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये येतो – 8GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज. याच्या बेस व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आहे. तर 256GB स्टोरेज असलेल्या 8GB RAM व्हेरिएंटची किंमत ३२,९९९ रुपये आणि 12GB रॅमच्या व्हेरिएंटची किंमत ३५,९९९ रुपये इतकी आहे.
फोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
किती सूट मिळेल?
ICICI बँक आणि OneCard ग्राहकांना या फोनवर ३,००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपयांची सवलत आणि रेड केबल क्लब सदस्यांना मोफत स्क्रीन गार्ड स्कीम मिळणार आहे.
फिचर्स काय आहेत?
OnePlus Nord 4 मध्ये 6.74-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यात 120Hz रीफ्रेश रेट आणि 2150 Nits चा पीक ब्राइटनेस आहे. डिव्हाईसमध्ये 'अलर्ट स्लाइडर' देखील देण्यात आला आहे. हँडसेट IP65 रेटिंगसह येतो. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरवर काम करतो.
फोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
यात 8GB आणि 12GB रॅमचा पर्याय देण्यात आला आहे. यात 256GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये 50MP Sony LYTIA प्रायमरी सेन्सर आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देखील आहे. कंपनीने फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेराही दिला आहे. फोन 5500mAh बॅटरीसह येतो. यात 100W वायर्ड चार्जिंग आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Oxygen OS 14.1 वर काम करतो.