असा मिळवा OnePlus Nord CE 2 5G वर 1500 रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये करा स्वस्तात खरेदी 

By सिद्धेश जाधव | Published: February 22, 2022 12:26 PM2022-02-22T12:26:26+5:302022-02-22T12:26:56+5:30

OnePlus Nord CE 2 5G: OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन आज 1500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.

Oneplus nord ce 2 5g all set to go on sale for the first time today  | असा मिळवा OnePlus Nord CE 2 5G वर 1500 रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये करा स्वस्तात खरेदी 

असा मिळवा OnePlus Nord CE 2 5G वर 1500 रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये करा स्वस्तात खरेदी 

googlenewsNext

OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन आज पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. दुपारी 12 वाजल्यापासून अ‍ॅमेझॉन आणि वनप्लस इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून हा फोन विकत घेता येईल. कंपनीनं यात 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट, 64MP Camera, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग आणि 4,500mAh Battery असे दमदार स्पेक्स दिले आहेत.  

OnePlus Nord CE 2 ची किंमत  

OnePlus Nord CE 2 चे दोन व्हेरिएंट बाजारात आला आहेत. फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर मोठ्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी 24,999 रुपये मोजावे लागतील. परंतु जर तुम्ही हा फोन आयसीआयसीआय बँकेच्या कार्डनं विकत घेतला तर तुम्ही 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. कंपनीनं या फोनचे Gray Mirror आणि Bahama Blue असे दोन कलर व्हेरिएंट देखील सादर केले आहेत.  

OnePlus Nord CE 2 चे स्पेसिफिकेशन्स  

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 2 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या वनप्लसमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपसाठी यातील 4,500एमएएचची बॅटरी 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

वनप्लस नॉर्ड सीई 2 5जी फोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ फ्लूड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 च्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. यात अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजनओएस 11 मिळतो. कंपनीनं यात मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेट एआरएम माली-जी68 एमसी4 जीपीयूसह दिला आहे. सोबत 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते.   

हे देखील वाचा:

Web Title: Oneplus nord ce 2 5g all set to go on sale for the first time today 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.