OnePlus घेणार रेडमी-रियलमीशी पंगा; स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये OnePlus Nord CE2 करणार एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: January 27, 2022 12:49 PM2022-01-27T12:49:08+5:302022-01-27T12:49:46+5:30
OnePlus Nord CE2 5G Phone: OnePlus Nord CE2 5G ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटची असू शकते.
OnePlus लवकरच स्वस्त 5G Phone च्या सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. सध्या या सेगमेंटमध्ये शाओमी आणि रियलमीचा दबदबा आहे. त्याला पर्याय म्हणून वनप्लसकडून OnePlus Nord CE2 5G Phone बाजारात येऊ शकतो. आता लीकच्या माध्यमातून समोर आले आहे कि, हा फोन कंपनी येत्या 11 फेब्रुवारीला लाँच करू शकते.
OnePlus Nord CE2 5G
OnePlus Nord CE2 5G ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटची असू शकते. तसेच हा फोन पुढील महिन्यात 11 फेब्रुवारीला ग्राहकांच्या भेटीला येईल, असं देखील सांगण्यात आलं आहे. वनप्लस नॉर्ड सीई2 5जी फोनबद्दल कंपनीनं मात्र कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
संभाव्य स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord CE 2 5G ची किंमत कमी ठेवण्यासाठी ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेट मिळू शकतो. सोबत ग्राफिक्ससाठी माली जी68 जीपीयू असल्याची माहिती लीक मधून समोर आली आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त 12GB रॅम दिला जाऊ शकतो. हा अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सिजन ओएस 12 सह बाजारात येऊ शकतो.
हा मोबाईल फोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेवर लाँच केला जाईल. पंच-होल डिजाईनसह येणार हा दिसले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. कंपनी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देऊ शकते. फोटोग्राफीसाठी आगामी वनप्लसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64 मेगापिक्सच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असेल. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येईल. पॉवर बॅकअपसाठी या वनप्लस फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळू शकते.
हे देखील वाचा:
- 108MP कॅमेरा, 8GB RAM परवडणाऱ्या किंमतीत; Redmi Note 11 सीरिज 13,400 रुपयांपासून सुरु
- Lokmat Tech Tips: अनेक वर्ष वापरून देखील नव्या सारखा राहील तुमचा स्मार्टफोन; फक्त या 5 गोष्टींची काळजी घ्या