स्वस्त OnePlus झाला आणखी स्वस्त; 10 हजार रुपयांचा डिस्काउंट, 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 05:27 PM2022-06-18T17:27:34+5:302022-06-18T17:27:54+5:30
OnePlus Nord CE 2 स्मार्टफोनमध्ये 64MP कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंग आणि Mediatek Dimensity 900 प्रोसेसर मिळतो.
OnePlus नं जास्त युजर्स पर्यंत पोहोचण्यासाठी आपली नॉर्ड सीरिज सादर केली होती. त्यामुळे या स्मार्टफोन्सची किंमत मिडरेंजमध्ये ठेवण्यात आली आहे. आता या सीरिजमधील OnePlus Nord CE 2 वर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे 64MP कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंग आणि Mediatek Dimensity 900 प्रोसेसर असलेला हा डिवाइस स्वस्तात विकत घेता येईल.
अशी आहे ऑफर
OnePlus Nord CE 2 5G चा बेस व्हेरिएंट 23,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु अॅमेझॉन इंडियावर हा फोन 9,200 रुपयांपर्यंच्या एक्सचेंज डिस्काउंटसह विकत घेता येईल. यासाठी तुम्हाला योग्य असा जुना मोबाईल द्यावा लागेल. म्हणजे हा नवीन वनप्लस फक्त 14,799 रुपयांमध्ये तुमचा होईल. हा मोबाईल ICICI बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास 1500 रुपयांची सूट देखील मिळेल.
OnePlus Nord CE 2 चे स्पेसिफिकेशन्स
फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 2 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या वनप्लसमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपसाठी यातील 4,500एमएएचची बॅटरी 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
वनप्लस नॉर्ड सीई 2 5जी फोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ फ्लूड अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 च्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. यात अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजनओएस 11 मिळतो. कंपनीनं यात मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेट एआरएम माली-जी68 एमसी4 जीपीयूसह दिला आहे. सोबत 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते.