सर्वांच्या हातात असेल OnePlus; 64MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 

By सिद्धेश जाधव | Published: April 2, 2022 01:01 PM2022-04-02T13:01:57+5:302022-04-02T13:02:01+5:30

OnePlus Nord CE 2 Lite च्या भारतीय लाँचची माहिती मिळाली आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असेल.  

OnePlus Nord CE 2 Lite 5G BIS TDRA Listing Spotted May Launch In India Soon  | सर्वांच्या हातात असेल OnePlus; 64MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 

सर्वांच्या हातात असेल OnePlus; 64MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 

Next

Oneplus 10 Pro भारतात लाँच झाला आहे, हा फ्लॅगशिप फोन येत्या 5 एप्रिलपासून विकत घेता येईल. हा डिवाइस जरी तुमच्या बजेटमध्ये नसला तरी कंपनीचा आगामी स्मार्टफोन तुमच्या खिशाला परवडू शकतो. आता OnePlus Nord CE 2 Lite 5G च्या भारतीय लाँचची माहिती समोर आली आहे. हा फोन BIS आणि TDRA सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. BIS लिस्टिंगवरून भारतीय लाँच निश्चित झाला आहे.  

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, यंदा Oneplus भारतात 6 स्मार्टफोन्स सादर करणार आहे. कंपनी तोच रोडमॅप फॉलो करत असल्याचं दिसतं आहे. त्या टाइमलाईननुसार, वनप्लस 10 प्रो नंतर एप्रिलमध्ये वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट भारतात लाँच केला जाईल. तसेच सेप्टेंबरपर्यंत अर्धा डझन वनप्लस डिवाइस भारतीयांच्या भेटीला येतील.  

नावाप्रमाणे, OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 5G चा हलका व्हर्जन असेल. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 24 हजार रुपयांपेक्षा नक्कीच कमी असेल. मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की हा फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर केला जाईल. या बजेटमध्ये रेडमी, रियलमी आणि मोटोरोलाकडून चांगली टक्कर मिळेल.  

OnePlus Nord CE 2 Lite चे संभाव्य स्पेसिफिकेशन  

वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट 6.59-इंचाच्या फुल एचडी+ एलसीडी 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह सादर केला जाईल. यात ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटचा वापर केला जाईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल. यात अँड्रॉइड आधारित ऑक्सिजन ओएस मिळू शकतो.  

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64MP प्रायमरी सेन्सर, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा मोनो सेन्सर असेल. डिवाइसच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर असेल. हँडसेट मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल, जी 33W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. 

Web Title: OnePlus Nord CE 2 Lite 5G BIS TDRA Listing Spotted May Launch In India Soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.