किती भारी दिसतो! OnePlus च्या सर्वात स्वस्त 5G Smartphone वर ग्राहकांची प्रतिक्रिया
By सिद्धेश जाधव | Published: April 16, 2022 05:11 PM2022-04-16T17:11:32+5:302022-04-16T17:29:24+5:30
OnePlus चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. आता या फोनचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
OnePlus भारतात आपला सर्वात स्वस्त 5G फोन लाँच करणार असल्याची बातमी गेले कित्येक दिवस येत आहे. हा फोन OnePlus Nord CE 2 Lite 5G नावानं येत्या 30 एप्रिलला देशात सादर केला जाईल. आता या स्मार्टफोनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चला जाणून या डिवाइसची डिजाइन, स्पेसिफिकेशन आणि आतापर्यंतची मिळालेली माहिती.
OnePlus Nord CE 2 Lite 5G ची डिजाईन
OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनची डिजाइन कंपनीनं टीज केली आहे. त्यानुसार फोनमध्ये सैद माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5mm हेडफोन जॅक आणि टाईप-सी पोर्ट मिळेल. बॅक पॅनलवर वरच्या बाजूला डावीकडे आयताकृती कॅमेरा मोड्यूल आहे, ज्यात दोन मोठे आणि एक छोटा कॅमेरा सेन्सर एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. फोनचा ब्लु टाइड कलर व्हेरिएंट टीज करण्यात आला आहे. OnePlus CE 2 Lite 5G ची डिजाइन मोठ्याप्रमाणावर Realme 9 Pro+ 5G आणि Oppo K10 सारखी वाटते.
OnePlus Nord CE 2 Lite चे संभाव्य स्पेसिफिकेशन
वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट 6.59-इंचाच्या फुल एचडी+ एलसीडी 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह सादर केला जाईल. यात ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटचा वापर केला जाईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल. यात अँड्रॉइड आधारित ऑक्सिजन ओएस मिळू शकतो.
फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64MP प्रायमरी सेन्सर, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा मोनो सेन्सर असेल. डिवाइसच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर असेल. हँडसेट मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल, जी 33W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.